Kidney Stone | किडनी स्टोनमुळे असाल त्रस्त तर ‘या’ 5 विशेष पदार्थांमुळे होईल मदत, जाणून घ्या कोणते

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kidney Stone | किडनी स्टोन (Kidney Stone) टाळण्यासाठी आहारात बदल करा. तुमच्या आहारात अशा खाण्यापिण्याचा समावेश करा जेणेकरून किडनीमध्ये स्टोन तयार होण्याची वेळ येणार नाही. येथे आम्ही अशाच काही आहाराबद्दल सांगत आहोत जे किडनीच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात-

 

या गोष्टींचा आहारात समावेश करा

1. जास्त पाणी प्या (Water) :
किडनीच्या आरोग्यासाठी पाण्यापेक्षा मोठे शस्त्र नाही. साधारणपणे असे दिसून येते की जे लोक कमी पाणी पितात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होतो. तज्ञांच्या मते, दररोज किमान 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे किडनीमध्ये टॉक्सीन तयार होत नाही. पुरेसे पाणी प्यायल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका खूप कमी होतो. (Kidney Stone)

 

2. राजमा खा (Rajma) :
राजमाला इंग्रजीत किडनी बीन्स म्हणतात. किडनीच्या आरोग्यासाठी राजमा आवश्यक मानला जातो. यामध्ये विरघळणारे फायबर असते जे पचनसंस्था मजबूत करते. किडनी बीन्समध्ये ग्लायसेमिक इंडेक्सची पातळी देखील खूप कमी असते, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

3. कुळीथ (Kulith) :
कुळीथमध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, पॉलिफेनॉल, फ्लेबेनॉइड्स इत्यादी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ असल्यामुळे, डॉक्टर अनेकदा किडनी स्टोनच्या रुग्णांना कुळीथ डाळ खाण्याचा सल्ला देतात.

 

4. अननस (Pineapple) :
किडनीच्या आरोग्यासाठीही अननस खूप फायदेशीर मानले जाते. त्याच्या नियमित सेवनाने इम्युनिटी मजबूत होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे किडनीशी संबंधित आजार कमी करण्यास मदत करते.

 

5. पालक (Spinach) :
पालक किडनीसाठी फायदेशीर आहे. या हिरव्या पालेभाज्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट मुबलक प्रमाणात आढळते.
पालकामध्ये आढळणारे बीटा-कॅरोटीन इम्युनिटी वाढवण्यास मदत करते. पालकाचा आहारात समावेश करून किडनी निरोगी ठेवता येते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Stone | home remedies that can help you to remove kidney stones

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Breastfeeding Nutrition Food | बाळाला देत असाल स्तनपान तर आहारात करा ‘या’ महत्वाच्या फूड्सचा समावेश

Crack Heels Remedies | घरीच बर्‍या करू शकता भेगा पडलेल्या टाचा, ‘या’ आहेत पद्धती

Diabetes | डायबिटीजचा धोका ‘या’ 6 लोकांना जास्त, तुमचा सुद्धा यामध्ये समावेश नाही ना?