Kidney Stone | मुतखड्याच्या त्रासापासून वाचायचे असेल, तर आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काही लोकांना मुतखड्याचा (Kidney Stone) त्रास असतो. ज्यांना तो असतो त्यांना फक्त माहीत असतं की, काय वेदना होतात. त्यामुळे अशा व्यक्तींना आपल्या आहारामध्ये खूप काळजीपूर्वक गोष्टी समाविष्ट कराव्या लागतात (Kidney Stone). तर आज आम्हीही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्ही मुतखड्याच्या समस्येपासून मुक्त व्हाल (How To Get Rid Of Kidney Stone).

 

1. टोमॅटोचा रस (Tomato Juice)
किडनी स्टोन काढण्यासाठी टोमॅटोचा रस खूप उपयुक्त आहे. दोन टोमॅटो चांगले धुवून बारीक करून घ्या. मीठ आणि काळी मिरी पावडर रसात मिसळून सेवन करा. नाहीतर तयार मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून नंतरही तुम्ही त्याचे सेवन करू शकता. (Kidney Stone)

2. लिंबाचा रस (Lemon Juice)
लिंबाच्या आत सायट्रिक ऍसिड (Citric Acid) असते. अशा वेळी किडनी स्टोनमध्ये लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास या समस्येवरही मात करता येते. एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस घाला, तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ (Salt) ही घाला. मिश्रण नीट हलवून घ्या आणि सेवन करा. असे केल्याने तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळतो.

 

3. तुळशीचा रस (Basil Juice)
किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासाठीही तुळशीपासून बनवलेला रस उपयुक्त ठरतो. अशा स्थितीत तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात एक चमचा मध टाकून तयार मिश्रणाचे सकाळी आणि संध्याकाळी सेवन करावे. असे केल्याने किडनीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Stone | how to remove kidney stone treatment tomato tulsi holy basil juice

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज

 

Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)

 

LPG Cylinder Price | उद्यापासून स्वयंपाकाचा गॅस होऊ शकतो आणखी महाग, आज बुक केल्यास मिळेल थोडा दिलासा !