बीड जिल्हा रूग्णालयात किडनीवरील शस्त्रक्रिया ‘सक्सेस’, दिड तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांच्या टिमला यश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – वीस दिवसांपुर्वी जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या एका रूग्णाची डावी किडनी निकामी झाली होती. त्याच्यावर खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी दिड लाखापर्यंतचा खर्च अपेक्षित होता. मात्र रूग्णाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने एवढा खर्च त्याच्या आवाक्याबाहेरचा होता. यासंदर्भात पत्रकार अमजद खान यांनी जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात आणि तेथील टिमशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात किडनीवरील शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दिड तासाच्या ऑपरेशननंतर डॉक्टरांच्या टिमला यश आले. सध्या रूग्णाची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दस्तगिर अकबर शेख (मोमीनपुरा, बीड) असे रुग्णाचे नाव आहे. शेख यांची डाव्या बाजुची किडनी निकामी झाली होती. त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात रेफर होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र आर्थिक परिस्थीती नाजुक असल्याने खाजगी रूग्णालयात जाऊन ऑपरेशन करणे शक्य नव्हते. त्यामुळे दस्तगिर शेख २० दिवसांपुर्वी जिल्हारूग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर किडनीची शस्त्रक्रिया होणे अत्यंत आवश्यक होते. मात्र ऑपरेशननंतर नातेवाईक आक्षेप घेतात म्हणुन जिल्हा रूग्णालय प्रशासन ऑपरेशन करण्यास सकारात्मक नव्हते. मात्र पत्रकार अमजद खान यांनी रूग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांची समजुत काढली. त्यानंतर नातेवाईक देखील ऑपरेशन करण्यास तयार झाले. स्वत: अमजद खान यांनी जबाबदारी घेतल्याने डॉक्टरांच्या टिमनेही मनावर घेऊन ऑपरेशन यशस्वी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, अप्पर शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाहेते, डॉ.माजेद, डॉ.चिंचोले आणि भुलतज्ञ तांदळे या टिमने तब्बल दिड तास ऑपरेशन केले. पत्रकार अमजद खान यांचा पाठपुरावा आणि वैद्यकिय अधिकार्‍यांच्या टिमची मेहनत यामुळे अतिशय गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.

अमजद खान ठरले रूग्णसेवेकरी –

बीड येथील पत्रकार अमजद खान नेहमीच रूग्णांच्या मदतीला धावुन जातात. यापुर्वी डॉ.बोल्डे शल्यचिकित्सक असतांना किडनीवरील पहिली शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळीही अमजद खान यांनी पाठपुरावा केला होता. यावेळीही अमजद खान यांनीच पाठपुरावा करून रूग्णाच्या नातेवाईकांची समजुत काढुन ऑपरेशनसाठी तयार केले. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनीही मनावर घेत अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे एका गरीब कुटुंबातील रूग्णाचा फायदा झाला असुन यानिमित्ताने अमजद खान पुन्हा रूग्णसेवेकरी ठरले.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like