जेजे रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण घोटाळा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक असलेल्या जेजे रुग्णालयात किडनी  प्रत्यारोपण घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. किडनी प्रत्यारोपण परवानगीसाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करणारे तुषार सावरकर आणि रहेजा रुग्णालयात को-ऑर्डिनेटर सचिन साळवे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी ताब्यात घेतले आहे.
एका तरुणाला रहेजा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची होती. यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल, असे रहेजा रुग्णालयामार्फत सांगण्यात आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3486c71-c616-11e8-9ddc-134e70c70062′]

ही प्रक्रिया तसेच परवानगीसाठी रहेजा रुग्णालयात को-ऑर्डिनेटर म्हणून काम करणारा सचिन साळवे याला मदतीस देण्यात आले. सचिन याने रुग्णाच्या अहवालाची फाइल जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकर यांच्याकडे पाठवली. तुषार सावरकर हा प्रत्यारोपण प्राधिकरण समितीच्या (ट्रान्सप्लान्ट ऑथरायझेशन कमिटी) मुंबई विभागाच्या समन्वयकांपैकी एक आहे. ही फाइल लवकरात लवकर पुढे सरकावी आणि परवानगी मिळावी यासाठी सचिनने स्वतःसाठी आणि तुषार सावरकर यांच्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली.

[amazon_link asins=’B07DM324BB,B072FNSWD8,B07FP91RBW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05ab9b0e-c617-11e8-af31-ed7419fb83d4′]

इतके पैसे देणे शक्य नसल्याने ८० हजारांपर्यंत तडजोड करण्यात आली. या तरुणाने हा सर्व प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्याने पैसे न देता याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुषार सावरकर यांच्या कार्यालयात सोमवारी सापळा लावला. या कार्यालयात ८० हजारांची रोकड घेताना सचिन याला रंगेहाथ पकडण्यात आले.

दिल्लीत शेतकऱ्यांचा एल्गार, किसान क्रांती यात्रा रोखण्यासाठी अश्रूधूर आणि  पाण्याचे फवारे

सरकारच्या नियमानुसार, राज्यातील खासगी किंवा सरकारी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी प्रत्यारोपण समितीची मंजुरी आवश्यक आहे. रुग्ण जमालुद्दीन यांचा भाऊ झाकिर हुसेन यांच्या माहितीनुसार, “माझा भाऊ तीन वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. चार महिन्यांपूर्वी त्याची किडनी निकामी झाली, तेव्हापासून त्यांना नियमित डायलिलिसवर ठेवलं होतं.”

[amazon_link asins=’B07B4T8KLS,B01BGPAOX0,B07CP59PM5′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de2f9d86-c617-11e8-b6a8-15215c6155c5′]

आमचं संपूर्ण कुटुंब भावाच्या मदतीसाठी पुढे आलं आणि आमच्या वहिनीची किडनी दान करण्यासाठी मॅच झाली. आम्हाला रहेजा रुग्णालयात पाठवलं होतं. तिथे सचिन साळवेने जेजे रुग्णालयातील तुषार सावरकरची भेट घडवून देण्यासाठीही दहा हजार रुपये घेतले होते. जमालुद्दीन यांची प्रकृती ढासळत असल्याने त्यांना तातडीने प्रत्यारोपणाची गरज आहे. अधिकारी घोटाळा उघड करण्यासाठी अधिकारी मदत करतील, अशी आशा आम्हाला आहे,” असंही झाकिर हुसेन यांनी सांगितलं.

जाहिरात.