Kids Brain | मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम करताहेत केमिकलपासून तयार खेळणी, ‘या’ पध्दतीनं करा बचाव; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Kids Brain | प्लास्टिकची खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये आढळणारे विषारी केमिकल (toxic chemicals in smartphone) मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी घातक सिद्ध होऊ शकते. एका संशोधनात शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे. संशोधनानुसार ऑर्गेनोफॉस्फेट एस्टर (OPEs) चा वापर अनेक प्रकारच्या प्रॉडक्टला फायर प्रूफ बनवण्यासाठी केला जातो, ज्याच्या संपर्कात आल्याने तरुणांची आयक्यू लेव्हल, एकाग्रता आणि बुद्धीवर (Kids Brain) खुप वाईट परिणाम होतो.

हे केमिकल लोकांमध्ये कॅन्सर आणि फर्टिलिटीसंबंधी समस्या वाढवते. कॅरोलिन युनिव्हर्सिटीच्या डॉ. हीथर पॅटीसोले यांच्यानुसार, टीव्हीपासून कारच्या सीटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये ऑर्गनोफॉस्फेट एस्टरचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो की, ते सुरक्षित आहे.

ऑर्गनोफॉस्फेट एस्टर सर्व पिढ्यांमध्ये मेंदूच्या विकासासाठी मोठा धोका आहे. भविष्यात यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. याचा वापर फायर सेफ्टी रेग्युलेशनच्या नावावर केला जातो. स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे OPEs हात किंवा फेसद्वारे कोणत्याही मनुष्याच्या शरीरात जाऊ शकते.

संशोधनानुसार, हे केमिकल ब्रेस्ट मिल्कमध्ये आढळू शकते.
याचा अर्थ स्पष्ट आहे की, हे ब्रेस्टमिल्कद्वारे थेट नवजात शिशुच्या शरीरात जाऊ शकते.
जर्नल एनव्हायरमेंट हेल्थमध्ये प्रकाशित या संशोधनात म्हटले आहे की,
आपल्याला लवकरात लवकर OPEs च्या प्रॉडक्टचावापर बंद केला पाहिजे.

या संशोधनाची आवश्यकता तेव्हा भासली जेव्हा ऑनलाइन पोर्टलवर विकली जाणारी निम्म्यापेक्षा जास्त खेळणी मुलांसाठी हानिकारक (Kids Brain) असल्याचे सांगितले जात होते.

Web Title :- Kids Brain | toxic chemicals in smartphone furniture and toys could harm kids brain health study warns

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | डिझेलच्या दराची शतकाकडे वाटचाल ! सलग सहाव्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात भाववाढ; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Band | पुण्यात शासकीय यंत्रणेचा गैरवापरकरून बंद करण्याचा प्रयत्न – भाजप शहराध्यक्ष मुळीक (व्हिडिओ)

TAMA Electric Car | 1947 मध्येच बनवण्यात आली होती टेस्लाच्या तोडीची इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या 130 वर्षांचा जुना इतिहास