रस्त्यावर भाजी विकता विकता अभ्यास करणाऱ्या मुलाला पाहून IAS अधिकारी म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एका होतकरू अभ्यासू मुलाचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो खूप बोलका असून अनेक गोष्टी यातून व्यक्त होताना दिसत आहे. एकीकडे रस्त्यावर बसून भाज्या विकताना दुसरीकडे अभ्याससुद्धा या मुलाने सुरु ठेवला आहे. समाजात अशी अनेक मुल आहेत, ज्यांना आपल्या घरच्या परिस्थितीमुळे इतर मुलांप्रमाणे बालपण इन्जॉय करता येत नाही. तरिही परिस्थितीवर मात करत काही मुले आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल करतात. या लहान मुलाची मेहनत पाहून सोशल मीडिया युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. IAS अधिकारी अवनीश शरण हा फोटो शेअर केला आहे.

पुष्पेंद्र साहू असे या मुलाचे नाव असून तो इयत्ता सातवीत शिकतो. आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी रविवारी या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून त्यांनी एक आकर्षक कॅप्शन फोटोला दिले आहे. आग कुठेही असो, मात्र सदैव जळत राहायला हवे असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे. आतापर्यंत या फोटोला 11 हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून 1 हजारापेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर आपली प्रतिक्रियासुद्धा दिली आहे.

मोठा होऊन हा मुलगा अधिकारी बनेल आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करेल अश्या कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. इतकेच नाही तर हा फोटो पाहून अनेकांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला आहे. हा फोटो कधी आणि कुठे काढण्यात आला याबाबत अद्याप खुलासा करण्यात आला नाही.