‘एक गरम चाय की प्याली’ तब्बल 78 हजारांना, ‘या’ अभिनेत्याने शेअर केले बिल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल बोस याला एका पंचतारांकित हॉटेलने दोन केळींसाठी 442 रुपये बिल भरावे लागले होते. त्यानंतर एका नेटकऱ्याने एक जेवणाचे देखील बिल शेअर करत या पंचतारांकित हॉटेल्सकडून केल्या जाणाऱ्या लुटीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आता अभिनेता किकू शारदा याने देखील आपले एक बिल शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे. किकू शारदा सध्या द कपिल शर्मा शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

त्याने आपले बिल शेअर करत आपल्याला 1 कप चहा आणि 1 कप कॅपचीनो कॉफीसाठी तब्बल 78,650 रुपये द्यावे लागल्याचे किकूने ट्विटरवरून सांगितले. त्याने हा फोटो ट्विटरवर शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सगळीकडे याची चर्चा होत आहे. मात्र यामागील सगळी कहाणी किकूने सांगितली असून त्याला एका चहासाठी 30 हजार तर एका कॉफीसाठी 35 हजार रुपये मोजावे लागले. त्याचबरोबर 13650 रुपये सर्व्हिस चार्जच्या रूपात घेण्यात आले.

यामुळे त्याचे संपूर्ण बिल हे 78 हजारांपेक्षा जास्त झाले. मात्र त्याने यासंबंधी कोणतीही तक्रार केली नसून त्याने यामागचे कारण देखील सांगितले. त्याने सांगितले कि, त्याच्याबरोबर घडलेला हा प्रसंग भारतातील नसून इंडोनेशियातील आहे. किकू सध्या तेथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. इंडोनेशियाचे चलन हे भारतीय चलनाच्या रूपात खूप कमी किमतीचे आहे. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक हे इंडोनेशियाला फिरायला जात असतात. मात्र किकूने भरलेल्या 78,650 रुपयाच्या बिलाचे भारतीय पैश्यात रूपांतर केले तर ते जवळपास 400 रुपये होते. त्यामुळे त्या चहाच्या आणि कॉफीच्या किमतींबाबत कोणतीही तक्रार करू इच्छित नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like