चीनचा उत्तर कोरियाचा हुकूमशहा कीम जोंगसोबत ‘दोस्ताना’, पाठवली ‘कोरोना’ची लस

पोलिसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना लसनिर्मितीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील काही महिन्यात कोरोनाची लस येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अशातच अमेरिकेतील तज्ज्ञांनी चीनवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना चीनने कोरोना लस पुरवल्याचा दावा अमेरिकेनं विश्लेषकांनी केला आहे.

चीनने किम जोंग उन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लसीकरण करण्यात आल्याचं म्हटलं आहे. प्रायोगिक तत्वावर असलेली करोनाची लस चीनने किम जोंग उन व त्यांच्या कुटुबीयांना पुरवल्याचा दावा हॅरी यांनी केला आहे. किम जोंग उन यांना पुरवण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे का, याबद्दल माहिती कळालेली नाही. त्याचबरोबर ही लस कोणत्या कंपनीनं पुरवली ही माहितीही मिळू शकली नाही, असंही हॅरी यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय थिंक टँक केंद्रांतील दक्षिण कोरियाचे अभ्यासक हॅरी कझिअनीस यांनी हा दावा केला आहे. किम जोंग उन आणि त्यांचं कुटुब, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या व राजकीय वर्तुळात सक्रिय असणाऱ्या इतर वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे. मागील दोन तीन आठवड्यात हे लसीकरण करण्यात आलं असून, चीन सरकारनं ही लस पुरवली, असं हॅरी यांनी १९ फोर्टी फाईव्हसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.

चीनमध्ये सध्या तीन कंपन्या कोरोनावरील लसीची निर्मिती करत करत आहे. अशी माहिती अमेरिकेचे शास्त्रज्ञ पीटर जे होटेज यांनी दिली. यात Sinovac Biotech Ltd, CanSinoBio आणि Sinopharm या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनीने त्यांच्या लशीचा चीनमध्ये दहा लाख लोकांनी वापर केल्याचा दावा आहे. दरम्यान, या तिन्ही कंपन्यांपैकी एकाही कंपनीने आपल्या लसीचा तिसऱ्या टप्प्यातील अहवाल अद्याप प्रसिद्ध केलेला नाही.

उत्तर कोरियाने अद्याप देशात एकाही कोरोना रुग्णाची माहिती दिलेली नाही; पण उत्तर कोरियात कोरोना झालेला नाही हे वृत्त दक्षिण कोरियाच्या गुप्तहेर बाहेर खात्याने फेटाळून लावले आहेत. उत्तर कोरिया आणि चिनी यांचे मोठ्या प्रमाणात व्यापारी संबंध आहेत. याच काळात कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता, असं म्हटलं जात आहे.