अमेरिकेला धमकावणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा ‘किम जोंग उन’चा आगळा वेगळा अंदाज, बर्फांच्या पर्वतावर केली ‘घोडेस्वारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या अणुबॉम्बच्या धमक्यांनी अमेरिकेला धमकावणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सध्या आरामाच्या मूडमध्ये आहे. देशातील वृत्तसंस्थेने काही फोटो व्हायरल केले आहेत. यामध्ये किम जोंग उन बर्फाळ प्रदेशात घोडेस्वारी करताना दिसून येत आहे. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे फोटो व्हायरल केल्यानंतर उत्तर कोरियाच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजेंसीने म्हटले की, किम जोंग उन यांनी उत्तर कोरियातील ऐतिहासिक बएकदू पर्वतीय भागाचा दौरा केला. या भागाला राजनीतिक इतिहास असून किम जोंग उन यांनी या भागात घोडेस्वारीचा देखील आनंद घेतला. उन यांचे वडील किम जोंग द्वितीय यांचा या ठिकाणी जन्म झाला होता. त्यांची या ठिकाणी हि तिसरी भेट असून जाणकारांच्या माहितीनुसार काही मोठा निर्णय घेण्याआधी ते या भागाचा दौरा करतात. याआधी ते डिसेंबर 2017 मध्ये याठिकाणी आले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. किम जोंग उन यांचे अशाप्रकारे फार कमी फोटो समोर येत असतात. मिसाइल परीक्षण, देशाच्या सीमेवरील दौरे आणि सैन्याच्या भेटीचे फोटो याआधी समोर आले होते.

दरम्यान, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवेळी देखील किम जोंग उन यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. त्यावेळी दोघांच्या बैठकीत अणुबॉम्ब प्रकल्पावर चर्चा झाली मात्र अमेरिकेच्या अटी मानण्यास उत्तर कोरिया तयार नसल्याने ट्रम्प यांनी हि चर्चा रद्द केली होती.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी