किम कार्दशियनचे तिसरे लग्न ‘या’ कारणामुळे तुटलं, घटस्फोटासाठी अर्ज दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडल किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. तिने नुकताच तिचा नवरा रॅपर कान्ये वेस्टशी लग्नाच्या 7 वर्षानंतर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कान्ये वेस्ट हा एका मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे किमशी असलेले त्याचं नातं टिकणे कठीण असल्याने तिने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे समजते. यापूर्वी किम कार्दशियानचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे

गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अमेरिकन मीडियाने असे वृत्त दिले होते की, गेल्या काही दिवसांपासून किम आणि कान्ये वेगळे राहत होते. कर्दाशियाने तिच्या घटस्फोटाच्या अर्जात आपल्या 4 मुलांची जॉईंट कस्टडीची मागणी केली आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. किम आणि कान्येने 2012 मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. यानंतर 2 वर्षांनी दोघांनीही इटलीमध्ये धुमधडाक्यात लग्न केले होते. यानंतर हे कपल सातत्याने मीडियामध्ये चर्चेत राहिले. कान्ये वेस्ट हा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले जातेय.