BOLD अंदाजामध्ये ‘मेट गाला’ या इव्हेंटमध्ये पोहचली किम कार्दशियन, तिला पाहून प्रेक्षक झाले थक्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकची मॉडेल किम कार्दशियन तिच्या ड्रेसिंग स्टाईलसाठी जगभर प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडियवर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये व अंदाजात आपले फोटो सोशल मिडियावर टाकत असते. तिचे नेहमी हॉट आणि सेक्सी फोटो व्हायरल करत असते. तिच्या फोटोंचे चाहते दिवाने आहे. प्रत्येक फोटोला चाहत्यांच्या कमेंट आहे. तिचे असे फोटो पाहून तिचे चाहते तिच्या फोटोला लाईक्स आणि कमेंट केल्याशिवाय राहत नाही.

किमने ‘मेट गाला’ च्या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये ती एकदम हॉट आणि सेक्सी दिसत होती. चाहत्यांच्या नजरा तिच्यापासून हटू शकल्या नाही. ती खुप आकर्षित दिसत होती. तिच्या प्रत्येक फोटोचा अंदाज वेगळा आहे. किमच्या फोटोला पाहून असे वाटते की एखादी कोरीव मुर्ती आपल्या समोर उभी केली आहे. नुकताच तिने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती एखादी मुर्तीसारखी दिसत आहे.

जेव्हा ‘मेट गाला’ च्या इव्हेंटमध्ये तिने एन्ट्री केली तेव्हा तीला पाहून लोक थक्क झाले. आणि तिला पाहतच राहिले. या ड्रेसमध्ये ती खुपच सुंदर दिसत होती. असा सेक्सी लुक ला पाहून कोणाला ही वेड लागेल यात शंकाच नाही. तिला पाहून नक्कीच असे वाटते की, वर्कआऊट करण्यासाठी ती खुप मेहनत घेत असेल.