न्यू जर्सीची किम कुमारी ‘मिस इंडिया यूएसए २०१९’ 

वॉशिंग्‍टन : वृत्तसंस्‍था – न्यू जर्सीच्या फोर्डस शहरात मिस इंडिया यूएसए २०१९ ही सौन्दर्य स्पर्धा मोठ्या थाटामाटात पार पडली. या स्पर्धेत न्यू जर्सीच्‍या किम कुमारीने विजयाचा मुकुट पटकावला आहे. तर न्यूयॉर्कची रेणुका जोसफ आणि फ्लोरीडाची आंचल शाह क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. ही स्पर्धा इंडिया फेस्टिव्हल कमिटीद्वारा आयोजित करण्यात आली होती. मुळच्या भारतीय असलेल्या अमेरिकन नीलम आणि धर्मात्मा सरन यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

‘मिनाक्षी शेषाद्री’ ‘लाईफटाईम अचीव्‍हमेंट ॲवॉर्ड’ने सन्मानित
१९८० साला पासून या स्‍पर्धा घेतल्‍या जात आहेत. प्रत्‍येक वर्षी आयोजित करण्‍यात येणारी ‘मिस इंडिया यूएसए’ सी स्‍पर्धा भारताबाहेर आयोजित होणारी भारतीय सौंदर्य स्पर्धा आहे. या स्‍पर्धेत एकूण २६ राज्‍यांतून ७५ स्‍पर्धक सहभागी झाले होते. या स्‍पर्धेत प्रमुख पाहुणे म्‍हणून प्रसिधद्‍ अभिनेत्री ‘मिनाक्षी शेषाद्री’ होत्‍या. त्‍यांना ‘लाईफटाईम अचीव्‍हमेंट ॲवॉर्ड’ने सन्‍मानित करण्‍यात आले. या सौंदर्य स्‍पर्धेत ‘मिसेस इंडिया यूएसए’ स्‍पर्धादेखील झाल्‍या. यात विधि दवे विजयी ठरली. तर ओहायोची अमृता चेहिल आणि सौम्या सक्सेना यांनी क्रमश: दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.