Photos : कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला निघाली किम शर्मा, चाहत्यांना पसंत पडला तिचा ‘अंदाज’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री किम शर्मा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे पण किम आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळे लाइमलाइटमध्ये असते. त्याचबरोबर ही अभिनेत्री तिच्या मॉर्निंग वर्कआउटसाठी नेहमीच चर्चेत असते. ही अभिनेत्री आपल्या बोल्ड लूकने चाहत्यांना प्रभावित करण्याचे काम करत असते. किम शर्मा ही नेहमी तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी चर्चेत असते. किम नेहमीच तिच्या वेगळ्या अंदाजामध्ये चाहत्यांना प्रभावित करत असते.

kim sharma

अलीकडेच अभिनेत्री आपल्या कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी स्पॉट झाली होती. या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून चाहतेही तिच्या फोटोंना खूप पसंती देत आहेत. फोटोत अभिनेत्री ब्राऊन कलरच्या कुत्र्यासोबत दिसत आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचे म्हणले तर पिवळ्या रंगाचे टी-शर्ट आणि ब्लॅक जेगिंग्स किमच्या लूकला परफेक्ट बनवित आहेत. किम कुत्राबरोबर चालताना दिसत आहे.

किमच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे म्हणले तर या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये 2000 साली पदार्पण करुन आपल्या करिअरला सुरुवात केली. तिचे चित्रपट हिट तर झाले पण किम बॉलिवूडमध्ये यश मिळवू शकली नाही. किम 2002 मध्ये ‘तुमसे अच्छा कौन है’, ‘हैरी’ सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसून आली. यानंतर लाइमलाइटपासून ती खूप दूर गेली.
kim sharma