राजा तो राजाच ! उदयनराजेंचा बालेकिल्ला सहीसलामत

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – गेली २ टर्म सलग निवडून येणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपला करिष्मा परत राखत यावेळी देखील सातारा लोकसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले विरूद्ध शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात लढत होती. या लढतीत उदयनराजे भोसले तब्बल १,२६,५२८ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांना ५ लाख ७९ हजार २६ मतं मते पडली. तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली.

सातारा लोकसभा मतदार संघात यंदा ६०. ३३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान या निवडणुकीत उद्यनराजेंचे कमी झालेले मताधिक्य त्यांच्यासाठी चर्चेचा तसेच चिंतेचा विषय झाला आहे.

————————————
सातारा लोकसभा मतदार संघ
————————————-

एकूण मतदार – ११,१७,७५७

एकूण मतदान – ६०. ३३ %

विजयी उमेदवार – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी )

मिळालेली मते – ५ लाख ७९ हजार २६

उदयनराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांना कुठून किती मतं ?

वाई 

उदयनराजे भोसले – १,००,४३८

नरेंद्र पाटील – ७०,०२८

उदयनराजे भोसलेआघाडी – ३०,४१०

कोरेगाव

उदयनराजे भोसले – १,००,२७४

नरेंद्र पाटील – ६६,९५८

उदयनराजे भोसले आघाडी – 9,682

कराड (उत्तर)

उदयनराजे भोसले– १,०४,४३७

नरेंद्र पाटील – ६५,४७४

उदयनराजे भोसले आघाडी – ३८,९६३

कराड (दक्षिण)

उदयनराजे भोसले- ८१,८२९

नरेंद्र पाटील – ८६,६५७

नरेंद्र पाटील आघाडी – ४,८२८

पाटण

उदयनराजे भोसले – ६७,४३९

नरेंद्र पाटील – ८५,४४६

नरेंद्र पाटी आघाडी – १८,००७

सातारा – जावळी

उदयनराजे भोसले – ९८९६०

नरेंद्र पाटील – ६४८९५

उदयनराजे भोसले आघाडी – ३४,०६५