पत्नी गौरीला इम्प्रेस करण्यासाठी गाणं गायचा ‘किंग’ खान ! गौरीला वाटायचा ‘फालतूपणा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिव़ूड स्टार शाहरुख खान एक रोमँटीक अभिनेता म्हणून ओळखला जातो. तुम्हाला माहिती आहे का केवळ रिल लाईफच नाही तर रिअल लाईफमध्येही किंग खान खूप रोमँटीक आहे. बी टाऊनमध्ये शाहरुख खान आणि गौरी खानच्या जोडीला बेस्ट कपलपैकी एक मानलं जातं. दोघांची लव स्टोरी खूपच फेमस आणि इंटरेस्टींग आहे.

शाहरुख आणि गौरीचा धर्म वेगळा असूनही दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत शाहरुख त्याच्या आणि गौरीच्या लव स्टोरीचे काही सिक्रेट सांगताना दिसत आहे.

View this post on Instagram

Happy birthday srk😍😘

A post shared by Shahrukh_Gauri (@srk_gauri_khan) on

व्हिडीओत दिसत आहे की, शाहरुख खान गार्डनमध्ये बसलेला आहे. व्हिडीओत शाहरुख म्हणत आहे की, “1984 सालची गोष्ट आहे तेव्हा 18 वर्षांचा होतो. तेव्हा मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. मी हौजखासमध्ये रहायचो आणि ती पंचशीलमध्ये रहात होती. मुलीचं नाव गौरी होतं. मी तिच्या घराकडे जाऊन किंवा जिथे लव्हर्स भेटायचे तिथं जाऊन गाणं गायचो. गौरी तेरा गाव बडा प्यारा मै तो गया मारा आ के यहां रे. परंतु तिला हे सगळं माझ्या पत्नीला म्हणजेच गौरीला खूप चीप वाटायचं” असं तो सांगतो. शाहरुख खानचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

#iamsrk#gaurikhan❤😘😘

A post shared by Shahrukh_Gauri (@srk_gauri_khan) on

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

You might also like