‘किंग’ खानची लाडकी सुहाना Online घेतेय ‘बेली’ डान्सचे धडे !


पोलीसनामा ऑनलाईन :
बॉलिवूड स्टार शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या लॉकडाऊनध्ये आपल्या हॉबिज पूर्ण करताना दिसत आहे. सुहानानं आपल्या घरीच आपला बेली डान्स क्लास सुरू केला आहे. व्हिडीओ कॉलवरून सुहाना धडे घेताना दिसत आहे.

सुहाना खान सध्या मुंबईची डान्स ट्रेनर संजना मुथरेजा हिच्याकडून बेली डान्सचे धडे घेत आहे. सुहानानं एक फोटो शेअर केला आहे ज्यात सुहाना आणि संजना व्हिडीओ कॉलवर गप्पा मारताना दिसत आहेत. संजनाही जमिनीवर बसलेली दिसत आहे. सुहाना देखील बोलताना स्माईल करत आहे असं व्हिडीओत दिसतंय.

संजना मुंबईमधील प्रसिद्ध बेली डान्स ट्रेनर आहे. सुहाना व्यतिरीक्त शनाया कपूर, रकुल प्रीत सिंह, किम शर्मा, जॅकलीन फर्नांडिस असे अनेक स्टार्स संजनाकडून बेली डान्स शिकले आहेत. सुहाना हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

सुहानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा पहिला सिनेमा(लुघपट) द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक शॉर्ट फिल्म आहे. या शॉर्ट फिल्मचे लेखक-दिग्दर्शक थियोडोर जिमेनो(Theodore Gimeno) आहेत. या सिनेमात सुहानासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याचे नाव ऑस्कर आहे.

https://www.instagram.com/p/B-TtfWuFVzo/

https://www.instagram.com/p/B-XCUqTHC6r/

https://www.instagram.com/p/B98V1VPFTdz/

https://www.instagram.com/p/B9t63Iinvzo/

https://www.instagram.com/p/Bk2vP_enY0x/

https://www.instagram.com/p/BeI_PjfF6RR/