‘किंग’ खानच्या ‘सर्कस’ मालिकेची पुन्हा ‘वापसी’ ! दूरदर्शनवर परत येत आहे ‘ब्योमकेश बख्शी’

पोलीसनामा ऑनलाईन :रामायण आणि महाभारत या टीव्ही शोजनंतर आात दूरदर्शननं इतर दोन मालिका पुन्हा टेलीकास्ट करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरून माहिती देण्यात आली आहे की, शाहरुख खानची मालिका सर्कस आणि जासूसी सीरियल ब्योमकेश बख्शी या मालिका पुन्हा प्रसारीत केल्या जाणार आहे. सिनेमात येण्यापूर्वी शाहरुख खान सर्कस आणि फौजी या मालिकेत काम करायचा.

कोरोनाच्या प्रकोपामुळं देशात आता 21 दिवस लॉकडाऊन आहे. अशात दूरदर्शनवर पुन्हा एकदा 80 आणि 90 च्या दशकातील मालिका टेलीकास्ट केल्या जाणार आहेत. यात रामानंद सागर यांची रामायण आणि बीआर चोपडा यांची महाभारत ही मालिकाही पुन्हा सुरू केली जात आहे.

दूरदर्शननं ट्विट करत माहिती दिली आहे की, शाहरुख खानची सर्कस (1989) पुन्हा टेलीकास्ट केली जाणार आहे. हा शो 28 मार्च 2020 पासून रात्री 8 वाजता दाखवला जाणार आहे. या मालिकेत आशुतोष गोवारीकर आणि रेणुका शहाणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. किंग खानच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही एक खुशखबर आहे. कारण ज्यांनी किंग खानची सुरुवातीच्या काळातील अॅक्टींग पाहिली नसेल तर ते आता त्या मालिकेचा पुन्हा त्याच चॅनलवर आनंद घेऊ शकणार आहे.

90 च्या दशकातील प्रसिद्ध डिटेक्टीव शो ब्योमकेश बख्शी(1993) ही मालिकाही पुन्हा दूरदर्शनवर सुरू केली जाणार आहे. ही मालिका 28 मार्च 2020 पासून सकाळी 11 वाजता प्रसारीत केली जाणार आहे. ही क्राईम सीरीज शरबिंदु बंडोपाध्याय यांच्या उपन्यासावर आधारीत आहे. यात रजित कपूर लिड रोलमध्ये आहे. तोच या शोचा डायरेक्टर आहे.