किंग्ज इलेव्हन पंजाबने 3 मोठ्या खेळाडूंना केले रिलीज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा सुद्धा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या अगोदर होणार्‍या मिनी ऑक्शनसाठी बीसीसीआयने 20 जानेवारी बुधवारी खेळाडूंना रिलीज करण्याची शेवटची तारीख ठेवली आहे. सर्व फ्रेंचायजी टीमच्या रिटर्न केलेल्या खेळाडूंची नावे हळुहळु समोर येत आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबने तीन मोठ्या खेळाडूंना रिटर्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वात मोठे नाव ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेलचे आहे.

यावर्षी होणार्‍या आयपीएलच्या अगोदर किंग्जच्या टीमने आपल्या रिटर्न केलेल्या खेळाडूंच्या यादीतून मॅक्सवेलला बाहेर ठेवले आहे. मागील सीझनमध्ये तो टीमसाठी काही खास करू शकला नव्हता. लागोपाठ फ्लॉफ झाल्याने त्याच्यावर खुप टीका झाली होती. ज्या खेळाडूंना किंग्जच्या टीमने रिलीज केले आहे त्यामध्ये वेस्टइंडीजचा गोलंदाज शेल्डन कॉटरेलसह अफगाणिस्तानचा मिस्ट्री स्पिनर मुजीब उल रहमान सुद्धा आहे. याशिवाय न्यूझीलँडचा ऑलराऊंडर जिमी निशम आणि हार्डस विलजोन आणि करुण नायर यांचाही समावेश आहे.

रिटर्न करण्यात आलेले खेळाडू
केएल राहुल, क्रिस गेल, निकोलस पूरन, मनदीप सिहं, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, मयंक अग्रवाल, रवि विष्णोई, प्रभसिमरन, दीपक हुड्डा, सरफराज खान, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, दर्शन नालकंडे, इशान पोरेल, हरप्रीत बरार.

रिलीज केलेले खेळाडू
ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कॉटरेल, कृष्णप्पा गौतम, मुजीब उल रहमान, जिमी निशम, हार्डस विलजोन आणि करुण नायर.