किन्नर फक्त एका रात्रीसाठी का आणि कोणासोबत करतात लग्न ? जाणून घ्या,सविस्तर 

वृत्तसंस्था : धर्तीवरील मानवी जीवनात स्त्री आणि पुरुष यांच्या व्यतिरिक्त आणखी एक प्रजाती आहे. त्यास आपण किन्नर असे संबोधतो. समाजात वावरतांना वेगळ्या पद्दधतीची वागणूक दिल्या जाणाऱ्या या किन्नरांविषयी आपणास इतर गोष्टी माहित असतीलही पण कायम नको त्या शब्दांमध्ये हिणवल्या जाणाऱ्या या किन्नरांचा विवाह नेमका कसा होतो. ते कोणा बरोबर विवाह करतात.त्यांच्या विवाहाची पद्धत नेमकी कशी असते.याविषयी सविस्तर माहिती पाहुयात, तामिळनाडु राज्यात अरावन देवाची पुजा करण्याची प्रथा आहे. त्यांना इरावन त्याचबरोबर किन्नरांची देवता असे देखील संबोधले जाते. या देवतेचा संबंध महाभारताशी असून त्यांनी महाभारतातील युद्धामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

कसा होतो किन्नरांचा विवाह?
किन्नरांचा एक दिवसाचा विवाह सोहळा तामिळनाडू येथील कुगाव येथे होतो. दर वर्षी तामिळ नववर्षाच्या पहिल्या पोर्णिमेला हजारो किन्नर येथे विवाह करतात. हा उत्सव जवळपास १८ दिवस चालू असतो. त्यामध्ये १७ व्या दिवशी किन्नरांचा विवाह होतो. आणि किन्नरांना पुजारी मंगळसूत्र घालतात. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी भगवान अरावनांची मूर्ती पूर्ण शहरात मिरवली जाते. आणि त्यानंतर त्या मूर्तीला तोडले जाते. या प्रकारालाच त्यांच्यात  सुहागरात असे म्हणतात. आणि त्यानंतर किन्नरांना त्यांचे अलंकार उतरवून विधवा बनावे लागते.

काय आहे या मागील रहस्य…. 
काय आहेत या मागे दडलेले रहस्य महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांनी काली देवीची पूजा केली होती. आणि या पूजेत त्यांना राजकुमाराचा बळी द्यावा लागणार होता. या कामासाठी एकही राजकुमार बळी देण्यास तयार नव्हता. त्याच वेळी इरावन समोर येऊन मी यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. मात्र त्याने यासाठी एक अट ठेवली होती.

नेमकी काय होती अट….. 
इरावन बळी जाण्यास तयार झाले मात्र त्यांनी बळी जाण्यापूर्वी एक अट पांडवांसमोर ठेवली ती अट अशी होती की, मी लग्नकेल्या शिवाय बळी जाणार नाही. पांडवांसाठी हे कठीण होते. त्यांना प्रश्न पडला होता की एका दिवसासाठी कोणती राजकुमारी यांच्याशी विवाह करेल. आणि दुसऱ्याच दिवशी विधवा होईल. यावर भगवान कृष्णांनी तोडगा काढला आणि स्वतः मोहिनीचे रूप धारण केले. त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे किन्नर ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. व त्यांनाच अराध्य देवता मानतात.