धक्कादायक ! तृतीयपंथीयांनी कापला प्रतिभाशाली ‘डान्सर’चा ‘प्रायव्हेट पार्ट’, रक्ताच्या थारोळ्यात सोडून ‘त्यांनी’ काढला पळ

चंदिगढ : हरियाणाच्या प्रतिभाशाली डान्सरचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याला हिमाचलप्रदेशातील रस्त्यावर फेकून देण्यात आले.या घटनेचा हरयाणातील यमुनानगर येथे संबंध आहे. पोटासाहिब येथील प्रतिभाशाली डान्सर कुलदीपला नृत्याची खूप आवड होती. याच आवडीमुळे त्याचा संबंध तृतीयपंथीय लोकांशी आला.

तृतीयपंथीयांशी वाढलेल्या जवळीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. तो तृतीयपंथींसोबत कार्यक्रमाला जात होता. यातून त्याला भरपूर पैसे मिळत होते. तृतीयपंथीयांना त्याच्यामुळे खूप पैसे मिळू लागले. तृतीयपंथीयांना कुलदीपचा डान्स खूप आवडला आणि त्यांनी त्याला त्यांच्या मंडळात सहभागी करून घेतले. एवढेच नाही तर त्याला पण तृतीयपंथी बनवले.

यासाठी कुलदीपला अमली पदार्थ खाऊ घातले आणि धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून टाकला. यातून कुलदीपचा जीव तर वाचला मात्र त्याचे जीवन उद्धवस्त झाले. आता तो न्यायासाठी पोलिसांकडे धावाधाव करत आहे.

कुलदीपला या घटनेमुळे प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे आता तो सतत रडत असतो. त्याने या घटनेसाठी बबली आणि पायल नावाच्या तृतीयपंथीयाला जबाबदार ठरवले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like