मुलांमधील अज्ञानाची दरी ज्ञानाने भरून काढली पाहिजे : किरण गित्ते

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

समुद्रापासून दूर असलेल्या मराठवाड्यात दळणवळणाची साधने कमी आहेत. शैक्षणिक संस्था क्वचित आहे. मुलांमध्ये माहितीचा अभाव दिसून येत आहे. ही अज्ञानाची दरी ज्ञानाने भरून काढली पाहिजेत. तरच जागतिक प्रवाहात आपण टिकून राहू असे मत पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी आधिकारी किरण गित्ते यांनी व्यक्त केले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bf8eaee5-c573-11e8-bd96-ef260606ce1a’]

मराठवाडा युवा मंचच्यावतीने उत्तम दंडिमे यांना जीवन गौरव व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य  करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्काराने भोसरी येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानौरू, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडूरके, मंत्रालयातील महसूल अप्पर सचिव शरद डोके, स्वातंत्र्य सेनानी जीवनधर शहरकर, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.सीमा मोरे, मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष सत्यजीत चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम दंडिमे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच डॉ.श्याम शिंदे (वैद्यकीय), महेश सावंत (प्रशासकीय), एन.एस.शिंदे (शैक्षणिक), रमाकांत रोडे (औद्योगिक), मोहन बडुरे (कला-क्रिडा), बाळासाहेब गायकवाड (युवा गौरव) यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

[amazon_link asins=’B002U1ZBG0,B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’11816bf1-c575-11e8-a309-438a4d945b75′]

ज्येष्ठांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य : श्रीरंग बारणे

यावेळी सीईओ गिते म्हणाले कि, आमचा मराठवाडा मागास असला तरी मराठवाडावासीय मनाने दिलदार व प्रामाणिक आहेत. रझाकारांनी आपल्या वर खूप अन्याय केला. या अन्यायातून आपला मराठवाडा उभा राहिला.  राहू, भविष्यात अंबानी सारखे महान उद्योजक मराठवाड्यातून घडावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री.डोके यांनी मराठवाडा नेहमी दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली. यावेळी दहावी  बारावीतील गुणवंत ३५ विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वधू-वर सुचक मंडळाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोरे यांनी केले. तर आभार ज्योती भोसले यांनी मानले.

[amazon_link asins=’B0785S3GX3,B0793P87D2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20468c92-c575-11e8-9aaf-eb7e7e082946′]

जाहीरात