Kiran Gosavi | किरण गोसावीच्या अडचणीत वाढ ! पुणे पोलिसांकडे आणखी 4 तक्रारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (Aryan Khan drugs case) मुख्य साक्षीदार किरण गोसावी Kiran Gosavi (वय-37 रा. वाशी, नवी मुंबई) याला पुणे पोलिसांनी (Pune police) अटक केली आहे. किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्याविरुद्ध पुणे पोलिसांकडे फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो फरार होता. गोसावीला अटक केल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे यावे असे आवाहन केले होते. त्यानुसार चार जणांनी किरण गोसावी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

किरण गोसावी (Kiran Gosavi) याने नोकरीच्या (JOB) आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्या विरोधात आणखी चार तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्यात आहेत. या चारही तक्रारी नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या आहेत. यापैकी तीन तरुण लष्कर परिसरातील तर एक वानवडी परिसरातील आहे. त्यांना संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यास सांगितले असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) 2018 मध्ये चिन्मय देशमुख Chinmay Deshmukh (वय-22) याने तक्रार दिली आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी त्याला 2019 मध्ये फरार घोषीत केले होते.

 

आर्यन खान सोबत काढलेल्या सेल्फीमुळे गोसावी चर्चेत आला होता. त्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. पुण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या गोसावीला गुरुवारी सकाळी कात्रज परिसरातून अटक केली. त्याला न्यायालयाने 5 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

गोसावीला घेऊन पोलीस मुंबईला

किरण गोसावीला अटक केल्यानंतर फरासखाना पोलीस तपासासाठी त्याला घेऊन मुंबईला गेले आहेत.
पोलिसांकडून त्याचे घर आणि ऑफिसची तपासणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
फरासखाना पोलिसांनी गुन्ह्याच्या कलमात वाढ केली असून त्याचाही तपास केला जात आहे.

 

Web Title :- Kiran Gosavi | Kiran Gosavi’s difficulty increases! 4 more complaints to Pune police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्र दोरड्यातील टोळी गजाआड; पुणे ग्रामीण पोलिसांनी केला 2.36 कोटींचा मुद्देमाल जप्त

Swadeshi Diwali | भारतात यावर्षी साजरी केली जाईल स्वदेशी दिवाळी, कॅटचा अंदाज; चीनला बसणार मोठा झटका

Pandharpur NCP | काय सांगता ! होय, NCP च्या पदाधिकार्‍यानेच केली राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात ईडीकडे तक्रार