Kiran Gosavi | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा पंच किरण गोसावीच्या दुबईवरून आलेल्या महिला साथीदार ‘कुसुम’ला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (Aryan Khan Drugs Case) एनसीबीचा (NCB) मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. अटकेत असलेल्या किरण गोसावीच्या (Kiran Gosavi) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. काल पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे नोकरीचे आमिष (lure of a job) दाखवून फसवणूक (Cheating) केल्या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari police station) गुन्हा दाखल झाला असतानाच, दुसरीकडे या प्रकरणात त्याची साथीदार असलेल्या कुसुम गायकवाड (Kusum Gaikwad) हिला लष्कर पोलिसांनी (lashkar police ) अटक केली आहे.

 

कुसुम गायकवाड दुबईहून परत येताच मोठ्या शिताफिने लष्कर पोलिसांनी तिला बेड्या (Arrest) ठोकल्या. किरण गोसावी (Kiran Gosavi) याची सहकारी असलेल्या कुसुमवर देखील शिवराज जामदार (Shivraj Jamdar) या तरुणाकडून 1 लाख 30 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. कुसुम गायकवाडकडून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लष्कर पोलिसांनी यापूर्वी गोसावीची महिला साथिदार शेरबानो कुरेशीला (Sherbano Qureshi) अटक केली आहे.

 

राज्यात 10 गुन्हे दाखल

किरण गोसावी याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 4 तर पिंपरी चिंचवडमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच राज्यात इतर भागात देखील गुन्हे दाखल झाले आहेत.
किरण गोसावी याच्यावर राज्यात आतापर्यंत 10 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत.
गोसावी याच्यावर फसवणुकीचा पहिला गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana police station) दाखल झाला होता.
त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गोसावीला अटक केल्यानंतर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहेत.

 

Web Title :- Kiran Gosavi | NCB Punch in Aryan Khan Drugs Case Kiran Gosavi’s female accomplice Kusum gaikwad from Dubai arrested

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा