Kiran Gosavi | साक्षीदार किरण गोसावीकडून आर्यन खानबद्दल मोठा खुलासा; म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kiran Gosavi | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन (Mumbai Cruise Drugs Case) खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन अनेक नवनवे खुलासे समोर येत दिसत आहे. यातच, आणखी एक मोठी बाब समोर आली आहे, अभिनेता शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या मुंबई ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याने आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. किरण गोसावीच्या कबुलीमुळे आणखी एक खळबळ उडाली आहे.

या खटल्यात किरण गोसावी (Kiran Gosavi) हा महत्त्वाचा साक्षीदार होता. त्यामुळे किरण गोसावी याने केलेल्या कबुलीमुळे या प्रकरणातील एनसीबीच्या कारवाईवर आणखी एकदा ताशेरे उठु शकतात. तर, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी छापेमारीत आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते. या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा साक्षीदार सॅम डिसूझा (Sam D’Souza) याने हा खुलासा केला आहे. असं किरण गोसावीने म्हटलं आहे.

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, व्हिझ्डम् क्रिकेट क्लब संघांचा सलग तिसरा विजय ! पुनित बालनची पाच विकेटची कमिगिरी

दरम्यान, किरण गोसावीने (Kiran Gosavi) मला फोन केला होता आणि सांगितले की आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकला आहे. परंतु, त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. त्याला मदत करावी लागेल. असं सॅम डिसूझाने एका मुलाखतीत सांगितलं आहे. तसेच. किरण गोसावीने सांगितले होते की, त्यांना शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांच्याशी बोलायचे आहे. त्यावेळी डिसूझा यांच्याकडे पूजा ददलानीचा नंबर नव्हता. त्यांनी व्यवस्था करून पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांच्याशी चर्चा करून घेतली होती.

या दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर सैल याने 25 कोटी रुपयांच्या डीलचा आरोप केला होता. यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे असल्याचे सांगण्यात आले. सॅम डिसूझा हा या डीलमध्ये किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यातील महत्त्वाचा दुवा होता. या आरोपांनंतर सॅम डिसोस बेपत्ता होता. प्रभाकर सिल म्हटले. तसेच, आता ते मुंबई एसआयटीलाही आपले म्हणणे देणार आहेत. सॅम डिसोझा यांच्या या ताज्या खुलाशामुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

हे देखील वाचा

Mumbai NCB | मुंबई एनसीबीची नांदेडमध्ये मोठी कारवाई ! 4 कोटींचा गांजा जप्त

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kiran Gosavi | ncb witness kiran gosavi admits no drugs recovered from aryan khan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update