Kiran Lohar | सोलापूरचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना न्यायालयाकडून दिलासा तर राज्य सरकारकडून दणका

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर जिल्हा परिषदेचे (Solapur Zilla Parishad) शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला असला तरी राज्य सरकारकडून (State Government) त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लाच प्रकरणात सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालायाकडून किरण लोहार (Kiran Lohar) यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र राज्य शासनाने लोहार यांच्या निलंबनाचे आदेश (Suspended) दिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी किरण लोहार यांना 25 हजारांची लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडण्यात आले होते.

 

राज्य शासनाच्यावतीने किरण लोहार (Kiran Lohar) यांचे निलंबनाचे आदेश दिले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत किरण लोहार निलंबित राहणार आहेत. तर निलंबनाची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांची नेमणूक मुख्यालयात असणार आहे.

 

स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या यु-डायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी (Education Officer) लोहार यांनी 50 हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाचेची रक्कम स्विकारताना लोहार यांना सोलापुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur Anti Corruption Bureau) सापळा रचून रंगेहाथ पकडले होते.

रणजीत डिसले गुरुजींनी देखील केला होता आरोप
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल रणजीत डिसले (Ranjit Disle) यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड (Global Teacher Award) मिळाला होता.
तसेच त्यांना अमेरिकेची फुलब्राईट शिष्यवृत्तीही (Fulbright Scholarship) जाहीर झाली होती.
किरण लोहार आपल्याला मिळालेल्या पुरस्कारापैकी काही पैसे मागत असल्याचा आरोप रणजीत डिसले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

 

Web Title :- Kiran Lohar | solapur kiran lohar education officer kiran loha finally suspended order issued by the state government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar | वादग्रस्त वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांचे टोचले कान, नेत्यांना दिले ‘हे’ आदेश

T20 World Cup | सेमी फायनलमध्ये पाऊस पडला ‘या’ प्रकारे जाहीर करण्यात येणार विजेता, आयसीसीचे नवीन नियम

Pune PMC News | पुणे मनपामध्ये करणार आणखी 200 हून अधिक पदांची भरती; आरोग्य आणि अग्निशामक दलामधील भरतीस प्राधान्य