Kiran Mane | शिवजयंती निमित्त किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले ‘सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई..’

पोलीसनामा ऑनलाइन : Kiran Mane | आज महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती मोठ्या धूम धडाक्यात साजरी केली जात आहे. प्रत्येक जण शिवरायांच्या भक्तीत रमलेले दिसत आहेत. तर अनेक जण आपल्या लाडक्या राजाला वंदन देखील करत आहेत. यात अनेक मराठमोळे कलाकार सुद्धा शिवरायांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिवादन करताना दिसत आहेत. त्यातच बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. किरण मानेंनी पोस्ट शेअर करत राजांबद्दल असलेले आपले प्रेम, आदर आणि भक्ती व्यक्त केली आहे. मानेंच्या या भावनिक पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात होताना दिसून येत आहे. (Kiran Mane)

किरण माने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आले होते. मात्र बिग बॉस मधून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. बिग बॉसच्या टॉप ३ मध्ये त्यांची वर्णी लागली होती. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. किरण माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त खास पोस्ट शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. किरण मानेंनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतानाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटले की, “शिवरायांच्या विलक्षण बुद्धीचे वर्णन करताना परमानंद यांनी अद्भुत असे शब्द वापरले. ते म्हणजे ‘अनल्प’ म्हणजे अफाट, अमर्याद. परमानंद हे अतिशय प्रतिभावंत शिवकालीन कवी होते. त्यांनी त्यांच्या शब्दातून शिवरायांचे वेळोवेळी कौतुक केले आहे. मी पहिल्यांदाच त्यांचा शिवराय संस्कार आणि शिक्षण हे पुस्तक वाचले आणि या पुस्तकातूनच अनल्प हा शब्द काळजाला भावला आणि आजही हा शब्द मस्तकात घुमत आहे. शिवरायांची बुद्धी ही खूपच तल्लख होती. शिवरायांच्या प्रत्येक कथा आपण आजही ऐकतो त्यावरून ते ताकदी पेक्षा बुद्धीचा कशा पद्धतीने वापर करायचे याचा उत्तम उदाहरण हे आपल्यासमोर उभे आहे. ” (Kiran Mane)

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यांच्या बुद्धीचे कौतुक करताना त्यांना मास्टरमाईंड म्हणणं देखील काही चुकीचे नाही.
प्रत्येक लढाई शिवराय हे बुद्धीने लढले. आपल्या सगळ्या कार्याचा उगम मेंदूतूनच होतो.
आपण कुठल्याही क्षेत्रात असो आपल्या मेंदूतूनच आपण विचार करतो आणि त्या गोष्टी सत्यात उतरवतो.
आपले बोलणे, आपली हालचाल, आपली ताकद आपण व्यक्त होण्यासाठी जे काही वापरतो ते आपल्या बुद्धीतून आपल्या वळणावर येते.
मन असो व मनगट पेन असं पिस्तूल कशालाही ताकद देण्याचे काम आणि दिशा देण्याचे काम त्याचबरोबर भान आणि नियंत्रण ठेवण्याचे काम हे बुद्धी करते.
आपल्याला जर शिवरायांच्या महान कार्याचा अभिमान बाळगायचा तर त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींबरोबरच बुद्धीचा देखील वारसा आपण बाळगला पाहिजे.
जर आपण समोरच्या शत्रूचा सामना बुद्धीने लढायचं तंत्र शिकलो तर सच्चा शिवभक्ताला कुठलीही लढाई
अवघड नाही.” सध्या सोशल मीडियावर किरण मानेंच्या या पोस्टची चर्चा होताना दिसत आहे.

Web Title :-  Kiran Mane | chhatrapati shivaji maharaj jayanti 2023 bigg boss marathi fame kiran mane post viral

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | मैत्रिणीने लावली सिगारेट आणि गांजाची सवय, बॉयफ्रेंडने केले असे काही की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Shiv Thakare | अखेर शिव ठाकरेने वीणा सोबतच्या त्याच्या नात्याबाबत केले भाष्य; म्हणाला “आमच्यातील मैत्री अजूनही…..”