Kiran Mane | किरण मानेंच्या ‘त्या’ पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाले – ‘लोक ट्रोल करताना बी तुझ्या अभंगाचा आधार घेतात…’

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेते किरण मानेंना (Kiran Mane) बिग बॉसमुळे (Bigg Boss) जास्त प्रसिद्धी मिळाली. किरण माने यांच्या पोस्ट देखील नियमित चर्चेचा विषय बनत असतात. किरण माने यांनी केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. आज तुकाराम बीज आहे, संत तुकाराम बीज म्हणजे तो दिवस ज्या दिवशी संत तुकाराम (Sant Tukaram) यांचे निधन झाले.आज त्यानिमित्त किरण माने हे पुन्हा एकदा त्यांच्या या पोस्ट मधून तुकारामांचे अभंग म्हणताना दिसले. (Kiran Mane)

किरण माने नेहमीच आपल्या लेखणीतून संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे दाखले देत असतात. शिवाय बिग बॉसच्या घरात देखील ते संत तुकारामांचे अभंग म्हणताना दिसले होते. आता किरण माने यांनी आज पर्यंत त्याच्या या खडतर प्रवासात त्यांनी कशाप्रकारे मात केली या सगळ्यांचा सार त्यांनी या पोस्ट मधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कठीण काळात कशाप्रकारे संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची साथ मिळाली याची दखल देखील त्यांनी या पोस्टमध्ये केली आहे. (Kiran Mane)

काय लिहिले किरण माने यांनी ?
किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “बा तुकोबाराया… तुझ्या सावलीत यिल त्याला “न सरे ऐसे दान” देनारा तू… मग लेकराला कमी करनारंयस व्हय? तू मला भरभरून दिलंयस माऊली, आभाळभर दिलंयस. अभिनेता म्हणून माझ्यावर अनेक लोक आज प्रेम करतात त्या लोकांपर्यंत मी तुझी विचारधारा शेअर करतो. माझ्या या खडतर प्रवासात तू नेहमीच मला साथ दिली आहे. माझ्यावर लोक अनेकदा निंदा करतात ते देखील तुझ्याच अभंगाचे आधार घेत माझ्यावर टीका करतात. मला या लोकांचा राग कधीच येत नाही. “निंदक तो परउपकारी.. काय वर्णूं त्याची थोरी !” असेच म्हणावे लागेल. तू प्रत्येक वेळेस माझे हात घट्ट पणे पकडून मला साथ दिली आहे.

“तुका म्हणे तुझ्या नामाचिये बळे… अवघियांचे काळे केले तोंड !” तर अगदी त्याप्रमाणेच तू माझ्या आयुष्यात आहेस. बिग बॉसमधी जायच्या महिनाभर आधी मी देहूला तुझ्या पायावर डोकं ठेवायला आलो,
तेव्हा माझी अवस्था खूपच बेकार होती. अनेक लोकांनी कटकारस्थानी करून माझ्यासमोरून कॅमेरा हिरावून घेतला.
या गोष्टीला सहा महिने उलटून गेले होते. “जीवना वेगळी मासोळी.. तैसा तुका म्हणे तळमळी” अशी अवस्था माझी झाली होती. यावेळी तू ज्या वेदनेतून गेलास ते डोळ्यासमोर आलं. तुझ्या या वेदनेपुढे माझे दुःख हे ‘जवा’एवढं. तिथून उठलो आणि पुन्हा जगायला लागलो”.

पुढे ते म्हणाले, “यावेळी बऱ्याच लोकांना वाटलं की मी संपलो आहे. आता माझ्या आयुष्यात काही राहिलं नाही.
मात्र यावेळी अशी भरारी घेतली की यासाठी केला होता हट्टाहास असं वाटायला लागलं.
सगळी लोकं केवळ पाहतच राहिली. पुढे एक एक पायरी चढत बिग बॉसच्या घरात कॅमेर्‍यातून रोज लाखो
कोट्यावधी लोकांपर्यंत तुझी अभंग पोहोचवताना छाती अभिमानाने भरून आली.
आता माझा आयुष्य एक नव्या वाटेवर गेले आहे. खडतर काट्याकुट्यांची वाट संपली आहे.
गाडी आता रुळावर आली आहे. हायवे काही अंतरावरच आहे मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील खूप संघर्ष
करावा लागणार आहे. पण यात देखील मी बिनधास्तपणे लढण्यासाठी सज्ज आहे. या पुढच्या वाटचालीस देखील
तू सोबत असशील याची खात्री आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीने देखील तुझ्या या अभंगातून अशीच वाट मिळू दे यात
काही काळजी घेणे नाही ही आमची जबाबदारी असणार आहे आणि ती मी पार देखील पडणारच शेवटी जाता जाता
एवढेच म्हणेन “तुका म्हणे जालें सायासाचें फळ… सरली ते वेळ काळ दोन्ही !”

Web Title : Kiran Mane | kiran mane latest post for tukaram bij 2023

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे