Kiran Mane | प्रसिद्ध अभिनेता किरण माने आता शरद पवार यांची भेट घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kiran Mane | मराठी प्रसिद्ध अभिनेता किरण माने (Kiran Mane) याना स्टार प्रवाह वरील ”मुलगी झाली हो” या मालिकेतून काढुन टाकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राजकीय विषयांवर भाष्य केल्यामुळेच मला काढून टाकण्यात आले असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर आज (शनिवारी) किरण माने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अधिक उत येण्याची शक्यता आहे.

किरण माने (Kiran Mane) आज मुंबईतील सिल्व्हर ओक येथे जाऊन शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटणार असल्याचे कळते. त्याचबरोबर मालिकेच्या निर्मात्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देखील दिलं आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेचे निर्माते म्हणाले, ‘किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे काढण्यात आलेले नाही, तर काही व्यवसायिक कारणांमुळे त्यांना काढल्याचं निर्मात्यांनी सांगितलं, पण एक मुलाखतीमध्ये माने यांनी याबाबत खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं.

दरम्यान, किरण माने यांनी (गुरुवारी) 13 जानेवारी रोजी सायंकाळी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. “काँट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा, गाड दो बीज हूँ मैं, पेड बन ही जाऊंगा!, असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. दरम्यान, आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला तरी आपण पुन्हा नव्याने उभारी घेऊ असे संकेत किरण मानेंनी आपल्या पोस्टमधून दिले आहेत. तसेच “होय, मला मालिकेतून काढून टाकले आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Web Title :  Kiran Mane | Marathi actor kiran mane will meet ncp chief sharad pawar

हे हि वाचा

IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ‘या’ 14 पोलिस अधिकार्‍यांना IPS केडर; जाणून घ्या नावे

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक

 

Tejashwi Prakash | ‘नागिन’ बनणार असल्याची चर्चा रंगताच तेजस्वी प्रकाशचे ‘हे’ सगळे फोटो व्हायरल

 

Indian Railway Recruitment 2022 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्या अंतर्गत भरती; जाणून घ्या

 

Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

 

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’