Kirit Somaiya | ‘जावयासाठीच ग्रामपंचायतींवर जिझीया कर लावण्यात आला,’ किरीट सोमय्या यांचे हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Kirit Somaiya | ईडीने चौकशीसाठी हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर धाडी टाकल्या. त्यानंतर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता भाजपचे खासदार किरीट सोमय्या (Kirit Samaiya) यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार आरोप केले आहेत.

ईडीने मिया हसन मुश्रीफ यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयावर धाडी टाकल्या आहेत. रजत कंजुमर आणि माऊंट कॅपीटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरून ४९ कोटी ८५ लाख रूपये मुश्रीफ कुटुंबीयांच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काहीच बोलत नाहीत. असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

आज (दि.१६) कोल्हापूर येथे आले असता, अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझीया कर आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे १५० कोटी रूपयांचा भूर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आणल्यावर हे कंत्राट रद्द करण्यात आले. पण, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. हुंडा म्हणुन हसन मुश्रीफांनी जावयाला १५० कोटी रूपये दिले आहेत.’ असा आरोप यावेळी बोलताना किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याबाबत बोलताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की,
‘मुंबई महापालिकेत कोविड घोटाळा झाला. तत्कालिन सत्ताधारी नेत्यांसाठी कोविड हे कमाईचे साधन होते.
खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर यांनी लाईफलाईन रूग्णालय सर्विसेसला १०० कोटी रूपयांचे
कंत्राट मिळालं. ही कंपनी कधीच अस्तित्वात नव्हती. तसेच, त्यांना रुग्णालय चालवण्याचा कोणाताच अनुभव नाही.
मग, या कंपनीला १०० कोटी रुपयांचं कंत्राट कसं दिलं.
या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनेक करोना रुग्णांचा मृत्यू झाला.’ असा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी
हसन मुश्रीफ यांच्यावर केला आहे.

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya attacks hasan mushif on ed inquiary

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन

Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु

Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा