Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा मोठा दावा, म्हणाले – ‘अनिल देशमुखांच्या अटकेनंतर आता पुढचा नंबर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kirit Somaiya | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींचे खंडणीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची गेली अनेक दिवस चौकशी सुरू आहे. अखेर अनेक दिवसांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) अटक करण्यात आले आहे. काल मध्यरात्री उशीरा देशमुखांना अटक केली आहे. या कारवाईनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभुमीवर आता भाजपचे जेष्ट नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) प्रतिक्रिया देत एक मोठा दावा केला आहे.

 

किरीट सोमय्या यांनी काल मध्यरात्री दोन वाजता ट्वीट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यावेळी सोमय्या म्हणाले की, अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने अटक केली. आता अनिल देशमुख (Anil Deshmukh) नंतर अनिल परब (Anil Parab).
याबाबत ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

 

दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याच्यांवरही किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते.
परब यांनी परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
बजरंग खरमाटे यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीच्या अधिकाऱ्यांकडे खरमाटे यांच्या 750 कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेची माहिती आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | anil parab will be next bjp leader kirit somaiya and nitesh rane tweets after anil deshmukh arrest

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर काय आहे सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

Winter Tips | थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने होते नुकसान, ‘या’ 10 चूका करणे टाळा; जाणून घ्या

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांना भेट, सरकारने वाढवला महागाई भत्ता