Kirit Somaiya | अनिल परबांना न्यायालयात हजर राहून हिशोब द्यावा लागणार – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांना न्यायालयात हजर राहून हिशोब द्यावा लागणार, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हंटले आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा अनिल परब (Anil Parab) यांच्यावरील वाद उकरून काढला आहे.

महाराष्ट्र सरकारने अनिल परब यांच्या विरोधात चिटिंग फ्रॅाड फोरजरीसाठी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मी उद्या रत्नागिरीत जाऊन रत्नागिरी पोलिसांना (Ratnagiri Police) माझा जाबाब देणार आहे. पोलीस माझा जबाब नोंदवून घेणार आहेत. काल भारत सरकारच्या याचिकेवर दापोली न्यायालयाने सी.आर.झेड मध्ये रिसॉर्ट बांधले म्हणून आणखी एक समन्स अनिल परब यांना बजावले आहे. आता अनिल परब यांना न्यायालयात देखील हजर राहावे लागणार आहे आणि हिशोब हा द्यावाच लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे प्रकरण मागील वर्षी किरीट सोमय्या
(Kirit Somaiya) यांनी बाहेर काढले होते. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी याच्या विरोधात आवाज उठविला होता.
तसेच हे रिसॉर्ट मी पाडणार म्हणून घोषणा सुद्धा दिल्या होत्या.
त्यानुसार न्यायालयाने हे अनधिकृत रिसॉर्ट पाडण्यासाठी आदेश दिले आहेत.
तसेच वर्तमानपत्रात जाहिरात करुन निविदा देखील मागविल्या आहेत. अनिल परब यांनी मात्र सुरुवातीपासूनच हे रिसॉर्ट आपले नसल्याचे सांगितले आहे. आता पुन्हा एकदा अनिल परब यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांना न्यायलयात हजर राहून या रिसॉर्ट प्रकरणी जबाब द्यावा लागणार आहे.

Web Title :-  Kirit Somaiya | Anil Parab will have to appear in court and give an account

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update