Kirit Somaiya | हसन मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला; ED कडे अधिकृत तक्रार करणार – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kirit Somaiya | महाविकास आघाडी सरकारला सतत धारेवर धरणारे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आणखी एका मंत्र्यावर आरोपांची तोफ सोडली आहे. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांवर एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरुन आता राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे.

मागील दोन दिवसापुर्वी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटलं होतं की, सोमवारी राष्ट्रवादीच्या (NCP) एका आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) एका ऩेत्याचा भ्रष्टाचार उघड करणार आहे.
यावरुन त्यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर
जोरदार आरोप केला आहे. मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत.
फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग (Money laundering) करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पानाचे पुरावे आहेत.
ते मी आयकर विभागाला दिले असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे.
मात्र त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्याचं नाव सांगितलं नाही.
एकाचं प्रकरण आज मी सांगितले. असे ते म्हणाले.

 

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत.
यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे.
ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. पुढे ते म्हणाले, हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ
यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये आयकर विभागाने (Income Tax Department) मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या.
बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.
दरम्यान, उद्या मुंबई येथे जाऊन ED कडे अधिकृत तक्रार करणार असल्याचे देखील सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हंटल आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | bjp kirit somaiya alleges maharashtra minister hasan mushrif for money laundering

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात लग्नाचे बनावट प्रमाणपत्र देऊन तरुणीला घातला 11 लाखांना गंडा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | आकाश भापकर टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई; आतापर्यंत 54 गँगवर MCOCA अ‍ॅक्शन