Kirit Somaiya | ‘संजय राऊतांच्या घरी भूकंप येईल, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर…’ – किरीट सोमय्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघाडीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप केले आहेत. आता त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना जाहीर आव्हान दिले आहे. सोमय्या (Kirit Somaiya) यांना अलीकडेच आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरण आणि शौचालय घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांना आव्हान केले आहे.

 

मला दोषमुक्त कसे करण्यात आले, याबद्दल ऐकले, तर संजय राऊतांच्या घरात भूकंप होईल. सोमय्या कुटुंबाने 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचे संजय राऊत म्हणाले होते. पण महाराष्ट्राच्या राजकारणात घाण कोणी केली? हे आदी त्यांनी जाहीर करावे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना मातोश्रीवर एक बैठक घेतली होती. या बैठकीत मीरा भाईंदरचे आयुक्त, पोलीस अधिकारी मधुकर पांडे, पर्यावरण सचिव मनिषा म्हैसकर आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. संजय राऊतांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी राजेश नार्वेकर कोण आहेत, हे जाहीर करावे. संजय राऊतांकडे माझ्या प्रकरणाची कागदपत्रे कशी आली? राजेश नार्वेकर यांनी दिली की उद्धव ठाकरेंनी त्यांना दिली? असे अनेक प्रश्न किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उपस्थित केले.

राजेश नार्वेकर संजय राऊत यांचे व्याही आहेत. त्यांनीच आम्हाला दोषमुक्त केले आहे.
किरीट सोमय्या, मेधा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठान निर्दोष असल्याची सर्व कागदपत्रे नार्वेकरांकडे होती.
आम्हाला संजय राऊतांच्या व्याहींनी दोषमुक्त केले आहे.
त्यामुळे आता संजय राऊत त्यांच्यावर सुद्धा आरोप करणार का? त्यांना विकत घेतले,
त्यांनी पैसे खाऊन दोषमुक्त केले असे संजय राऊतांनी सांगावे.
मी त्यांना तसे आव्हान करतो, असे सोमय्या म्हणाले.

 

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp kirit somaiya on mumbai police clean chit over toilet scam ins vikrant sanjay raut uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा