Kirit Somaiya | ‘या’ मंत्र्यावर कारवाई केली तर आदित्य ठाकरे, अजित पवारांवर कारवाई करावी लागणार; सोमय्यांचा खळबळजक दावा!

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. अशातच त्यांनी आता राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी 100 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. त्या आरोपानंतर त्यांनी थेट ठाकरे (Thackeray Family) आणि पवार कुटुंबावर (Pawar Family) निशाणा साधला आहे.

ठाकरे आणि पवार सरकार मुश्रीफ यांच्यावर कारवाई करणार नाही. दोन्ही कुटुंब घोटाळेबाज आहेत. जर मुश्रीफांवर कारवाई केली तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर कारवाई करावी लागेल. त्यामुळे एक कुटंब दुसऱ्या कुटुंबाला वाचवत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे.

 

मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला?
याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. मात्र ठाकरे सरकार हसन मुश्रिफांवर कारवाई करणार नाही.
त्यामुळे आयकर विभागाला (Income Tax Department) तक्रार केली असल्याचं सोमय्यांनी सांगितलं.

 

 

दरम्यान, किरीट सोमय्यांच्या या दाव्यावर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya allegations on hasan mushrif 100 crore money laundering case as well as thackeray and pawar family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | प्रशासकाच्या कार्यकाळातही महापालिकेच्या ‘वित्तिय समितीचे’ अस्तित्व कायम ! आयुक्तांनी पुढील आठवड्यात समितीच्या बैठकीचे केले आयोजन

 

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

 

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं