Kirit Somaiya | सोमय्यांनी शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याविरोधात थोपटले दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील (Dapoli) साई रिसॉर्टवर (Sai Resort) कारवाई करण्यासाठी कोकणवारी केली होती. त्यावेळी दापोलीमध्ये राजकीय शिमगा पाहायला मिळाला होता. ते प्रकरण कुठे शांत झालं नाहीतर सोमय्यांनी (Kirit Somaiya) राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास (Rural Development Minister) मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुणे (Pune) दौऱ्यावर असून त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कंपन्यांची पाहणी केली. मुश्रीफ कुटुंबीयांनी तब्बल 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप (Serious Allegations) किरीट सोमय्या यांनी केला आहे. पुण्यामध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून हा पैसा कोणत्या कंत्राटदाराकडून आला? याची चौकशी करण्याची जबाबदारी ठाकरे-पवार सरकारची आहे. मात्र ठाकरे सरकार हसन मुश्रिफांवर कारवाई करणार नाही. त्यामुळे आयकर विभागाला (Income Tax Department) तक्रार केली असल्याचं सोमय्या म्हणाले.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्याकडे आलेला पैसा हा भ्रष्टाचारातून आलेला आहे. ठाकरे सरकारने याची चौकशी का केली नाही?, असा सवाल सोमय्यांनी केला. मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयाने (Pune Sessions Court) स्वतः याचिका दाखल केली असून त्यांच्यावर बेनामी कायदा, आयकर विभाग आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) याअंतर्गत कारवाई सुरू झाल्याचं सांगितलं आहे. यावर आता मुश्रीफ काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya allegations on hasan mushrif 100 crore money laundering case


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Aryan Khan Drugs Case | क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी 60 दिवसांची मुदतवाढ

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

Delhi Saket Court | ‘मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या संपत्तीवर जावई, नातवांचा हक्क’ – कोर्टाचा महत्‍वपूर्ण निर्वाळा

Dilip Walse Patil | ‘भाजप नेत्यांवर कारवाई का करत नाही?’ शिवसेनेच्या सवालानंतर गृहमंत्री म्हणाले…

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR