Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रावादीकडून (NCP) थेट टीका होत आहे. या टीकेवर भाजपचे (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांना ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है’ असं म्हणतात त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना 1993-94 मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? हे विचारावं, अशा शब्दात सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हल्लाबोल केला आहे. ते मलाड पूर्वमध्ये भाजप दिंडोशीच्या कार्यकर्त्यांसोबत बोलत होते.

दाऊद कुणाचा बाप आहे हे…

किरीट सोमय्या म्हणाले, समीर तु दलित नाही, तु मुस्लिम (Muslim) आहे. क्रांती रेडकर (Kranti Redkar) तुझा नवरा मुस्लिम आहे. त्याचं पहिलं लग्न नाही निकाह झाला होता. समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है, त्यांचा बाप नाही, ठाकरे सरकारचा बाप असलेल्या शरद पवारांना विचारा 1993-94 मध्ये दाऊदसोबत कोण बसलं होतं? दाऊदसोबत कोण बसलं होतं हे शरद पवार विसरले का? ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. दाऊदचा संबंध कुणाशी आहे, दाऊद कुणाचा बाप आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला समजलंय, अशा शब्दात त्यांनी घणाघात केला.

मलिकांनी तक्रारदाराचे अपहरण केलं

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुढे म्हणाले, समीर वानखेडे यांच्यावरील आरोपानंतर अमित शाह (Amit Shah) यांनी एसआयटी (SIT) पाठवली. त्यांनी वानखेडेंवर शाहरुख खानकडून (Shah Rukh Khan) 50 कोटी रुपयांची खंडणी (Ransom) घेतल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारदारांना चौकशीसाठी पाठवण्यास सांगितले. मात्र यांची टरकली आणि त्या दोन खोटारड्यांना अंडरग्राऊंड केले. ते एसआयटी समोर आलेच नाहीत. एनसीबीची टीम परत गेली. नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तक्रारदारचं अपहरण केलं. ते कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

Parambir Singh | परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेत्याचा दावा; केली ‘ही’ मागणी

हे वसुली सरकार

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र करणार अशी शपथ घेतली होती वाटतं. जिथ पहा तिथं घोटाळे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भलेही महाराष्ट्राला भ्रष्टाचारयुक्त केलं असेल, पण आम्ही त्यांचं आव्हान स्विकारत महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त करु. ठाकरे-पवारांनी मराठी माणसाच्या अस्मितेचं नाव घेत हे महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

दिवाळीनंतर 3 मंत्री,3 जावयांचे फटाके फोडणार

सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. परंतु किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे.
एक,दोन तीन चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे.
घोटाळेबाज ठाकरे पवारांनी 12 दिवस नाटकं केली. यात 3 मंत्र्यांच्या 3 घोटाळ्यांचा आणि त्यांच्या 3 जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे.
अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या जावयाला खूश केलं.
हसन मुश्रीफांनी (Hassan Mushrif) त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं.
एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. त्यांनी केवळ लवंगी फटाके फोडले, असे सोमय्या यांनी सांगितले.

हे देखील वाचा

SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया

Dhantrayodashi 2021 | यावेळी धनत्रयोदशीला केवळ 1 रुपयात खरेदी करा सोने, जाणून घ्या काय आहे पद्धत?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kirit Somaiya | BJP Leader kirit somaiya ask question to ncp chief sharad pawar and cm uddhav thackeray over ncb officer sameer wankhede and dawood

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update