Kirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा’ अशी सुचना त्यांनी केलीय – किरीट सोमय्या

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यावर भाजपचे (BJP) जेष्ठ नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) आणखी एका घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे सहकारी कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा झाला असल्याचं म्हणत मुश्रीफ आणि आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज कारखान्याचा काय संबंध? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अशी सूचना आपल्याला स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. असं किरीट सोमय्यां म्हणाले.

किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) आज (सोमवारी) कराड पोलिसांनी कोल्हापूरला जाण्यापासून अडवल्यानंतर सोमय्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत त्यांनी माहिती दिली. हसन मुश्रीफ आणि परिवाराने आप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी कारखान्यात (Gadhinglaj Cooperative Sugar Factory) 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. एवढेच नाही, तर 2020 मध्ये कुठल्याही पारदर्शतेशिवाय हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. ब्रिक्स इंडिया कंपनी ही बेनामी कंपनी आहे. हसन मुश्रीफांचे जावई या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पुढं सोमय्या म्हणाले की, कोलकात्याच्या शेल कंपन्यांच्या नावाने पैसे उभारले गेल्याचा आरोप करत, या घोटाळ्यासंदर्भात आपण ED कडे कागदपत्रे देऊन उद्या तक्रार करणार आहोत.
तसेच, कारखान्यातील 98 टक्के शेअर्स हे एका बैनामी कंपनीचे आहेत.
कोणताही साखर कारखाना चालवण्याचा अनुभव नसलेल्या कंपनीकडे जबाबदारी का दिली गेली.
हे शरद पवारांना (Sharad Pawar) जास्त माहीत आहे. असेही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांमधील ‘कोल्ड वॉर’ अद्याप सुरूच !

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

Ration Card Services | आता रेशन कार्डसंबंधी प्रत्येक समस्येचे तात्काळ होईल निवारण, ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर मिळतील ‘या’ सेवा

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya attacks ncp leader hasan mushrif karad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update