Kirit Somaiya | किरीट सोमय्या थेट मंत्रालयात ! कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून केल्या फाईल्स चेक, चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना (BJP And Shiv Sena) यांच्यात अनेकवेळा शीतयुद्ध पाहायला मिळते. त्यातच भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सतत विरोधंकाची प्रकरणे बाहेर काढण्यात प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आघाडी सरकारमधील अनेक मंत्री, नेत्यांवर गैरव्यवहाराचे खळबळजनक आरोप सोमय्यांनी केले आहेत. आता तर थेट मंत्रालयात (Ministry) जाऊन फाईल चेक केल्या आहेत. यामुळे आणखी मोठी खळबळ उडाली आहे.

 

 

आज (सोमवारी) किरीट सोमय्यांचे (Kirit Somaiya) मंत्रालयातील फाईल्स चेक करतानाचे काही फोटो प्रसारित झाले आहेत.
त्यावरून राजकीय वातावरणात मोठी चर्चा रंगली आहे.
सोमय्या मंत्रालयातील नगर विकास खात्यामध्ये (Urban Development Department) (कक्ष 16) मध्ये आज गेले होते.
त्याठिकाणी ते शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी काही फाईल्स चेक केल्या आहेत.
कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून फाईल्स बघतानाचे सोमय्या यांचे मंत्रालयातील फोटो प्रसारित झाले आहेत.

 

 

दरम्यान, सोमय्या यांनी कोणत्या अधिकाराखाली मंत्रालयात जाऊन अशाप्रकारे फाईल्स चेक केल्या आहेत? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहू लागले आहेत.
त्याचबरोबर अधिकार्‍यांनी देखील कुठल्या अधिकारामध्ये संबधित फाईल्स त्यांना पाहायला दिल्या यासंदर्भात मंत्रालयात चर्चेला उधाण आलं आहे.

 

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya in the ministry sitting on an employee chair and looking at files

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु

 

Pune Congress | PM नरेंद्र मोदी यांनी मुलींबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पुणे शहर महिला काँग्रेसतर्फे निषेध (व्हिडिओ)