Kirit Somaiya | आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Kirit Somaiya | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आल्यापासून भाजप नेते (BJP) आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे सत्ताधारी मंत्री, नेत्यावर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असल्याचं दिसले. यानंतर सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यावर तोफ डागली. शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Shiv Sena leader Arjun Khotkar) यांच्यावर सोमय्यांनी गंभीर आरोप केला आहे. खोतकर यांच्या निवास्थानी आणि कार्यालयावर ED ने धाड टाकली असतानाच सोमय्यांच्या नव्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ‘अर्जुन खोतकर यांनी मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इतर इमारतीसाठी शंभर एकर जागा हडपण्याचा प्रयत्न केला.
असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. खोतकर यांच्यावर गंभीर आरोप करत असताना सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा देखील उल्लेख केला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कृपेने याच कारखान्याशी संबंधित 100 एकर शासकीय जागा हडपण्याचा घोटाळा सुरू आहे.
असं वक्तव्य देखील सोमय्यांनी केलं आहे. तसेच, खोतकरांना मॉल तयार करायचा असून कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि इमारतीसाठी त्यांना ही जागा हवी असही त्यांनी म्हटलं आहे.

 

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘राज्य सरकारने साखर कारखान्यासाठी दिलेल्या त्या जागेची किंमत 400 कोटी रुपये आहे.
तसेच ही जागा एकूण 240 एकर आहे, या संपूर्ण जागेची किंमत तब्बल 1000 कोटी रुपये असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे.
या प्रकरणी ईडीने (ED) योग्य पद्धतीने तपास सुरू केला असून अर्जुन खोतकर यांची आयकर विभागाला (Income tax department) देखील तक्रार करण्यात आली आहे. असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘आयकर विभाग खोतकर यांच्या बेनामी व्यवहाराचा तपास करणार असल्याचे सांगतानाच आता मुळे,
तपाडीया परिवार यांचे देखील नावही पुढे येत असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आता शिवसेना खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांनी ईडीपुढे (ED) हजर व्हायला हवे, असंही त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya made serious allegations on shiv sena leader arjun khotkar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | दरमहिना होईल 1 लाखाची कमाई ! 2 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ व्यवसाय, मोदी सरकार देईल 4 लाख रुपये

Whatsapp Voice Call Recording | ‘व्हॉट्सअ‍ॅप कॉल’ करायचा असेल रेकॉर्ड, तर जाणून घ्या कोणत्या पद्धतीने करू शकता हे काम?

Unified DCPR Maharashtra | खुशखबर ! 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरात बांधकामांना ऑनलाईन परवानगी