Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं ट्वीट; म्हणाले – ‘मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ 8 शिवसेना नेत्यांना अटक होणार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुण्यात (Pune) शनिवारी शिवसेना कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर सोमय्यांना कसबसं सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर काढलं. धक्काबुक्कीमध्ये ते महापालिकेच्या पायरीवर पडले होते. त्यामुळे त्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी डिस्चार्ज (Discharge) मिळाल्याचे ट्विट करत मोठा दावा केला आहे.

 

पुणे महानगरपालिका (Pune Corporation) आवारात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर सोमय्या यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आताच्या केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, ”पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह (Sanjay More) 8 शिवसेना नेत्यांना अटक (Arrested) होणार आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमं लावण्यात आली याची देखील सोमय्या (Kirit Somaiya) यांनी माहिती दिली आहे.

 

”मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह 8 शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. एफआयआर क्रमांक – IPC कलम 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504, 37(1), 135” असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

 

 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी एफआयआरची (FIR) कॉपी देखील पोस्ट केली आहे. त्यामध्ये शिवसेना पुणे शहराध्यक्ष संजय मोरे (Sanjay More) तसेच पदाधिकारी चंदन साळुंके (Chandan Salunkhe), किरण साळी (Kiran Sali), सुरज लोखंडे (Suraj Lokhande), आकाश शिंदे (Akash Shinde), रुपेश पवार (Rupesh Pawar), राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde), सनि गवते (Sunny Gwate) यांचे नावे आहेत.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP leader kirit somaiya name 8 shivsena leaders including sanjay more pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा