Kirit Somaiya | किरीट सोमय्यांच्या दिल्लीवारीने महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अडचणी वाढणार?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) अनेक दिग्गज नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यासंदर्भात सखोल चौकशी करावी यासाठी सोमय्या (Kirit Somaiya) दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. त्यांनी स्वतः यासंदर्भात ट्विटरवरून माहिती दिली. तसेच त्यांनी सहकार, वित्त आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

ट्विटवर माहिती देताना सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, मी आज दिल्लीत आहे. शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), भावना गवळी (Bhavana Gawli), आनंद अडसूळ (Anand Adsul), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अनियमितता आणि फसवणुकीचा (Cheating) पाठपुरावा करण्यासाठी सहकार, अर्थ आणि ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

 

खोतकरांवर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असताना किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. एक हजार रुपये किमतीची जमीन शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिली होती मात्र ती जमीन त्यांनी बळकावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दुसरीकडे सोमय्या यांच्या सर्व आरोपाचे खोतकर यांनी खंडन केलं होतं.

 

सोमय्या यांचे अनेक नेत्यांवर गंभीर आरोप

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
नुकतेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते.
सोमय्या यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मत्री हसन मुश्रीफ,
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर, परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad),
शिवसेनेच्या नेत्या भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांच्यावरही आरोप केले आहेत.
विशेष म्हणजे यातील काही नेत्यांवर तसेच त्यांच्या निकटवर्तीय आणि नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी (central investigation agency) छापे देखील मारले.
त्यानंतर आता सोमय्या पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आणखी काही नेत्यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण आता कोणाचा नंबर असरणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP Leader kirit somaiya on delhi tour for meet officials of cooperation and finance ministry Arjun Khotkar Bhavana Gawli Anand Adsul hasan mushrif ajit pawar jitendra awhad central investigation agency marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Palghar Accident | एकवीरा देवीच्या दर्शनावरून परतताना ECO Car-कंटेनरमध्ये जोरात धडक; तिघांचा मृत्यु तर 9 जखमी

Ajit Pawar | …. अन् अजित पवारांनी कपाळावरच हात मारला; जाणून घ्या प्रकरण

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी