Kirit Somaiya | हसन मुश्रीफ यांच्यावर ED च्या छापेमारीबाबत बोलले किरीट सोमय्या; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापूरमधील कागल येथील घरांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहेत. आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यावर भाजपचे खासदार किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यात त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यासोबतच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Kirit Somaiya)

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना किरीट सोमय्या(Kirit Somaiya) म्हणाले की, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे लाडके हसन मुश्रीफ यांनी स्वत:च्या जावयाला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबलं होतं. पण, मी महाराष्ट्राच्या जनतेला वचन दिलं आहे, की सर्व घोटाळेबाजांचा हिशोब घेऊनच राहणार आहे. अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंसोबतच शरद पवार यांच्यावर देखील टीका केली आहे.

हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना १५०० कोटी रूपयांचे कंत्राट जावयाच्या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला दिले होते. सरसेनापती कारखान्याच्या माध्यमातून जवळपास १५८ कोटी रूपयांचे मनी लाँड्रींग करण्यात आलं. या सर्वांचा आता हिशोब होत असल्याचे यावेळी बोलताना किरीट सोमय्या(Kirit Somaiya) म्हणाले.

नेमके काय आहे हे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते.
२०२० साली आप्पासाहेब नलावडे कारखाना ब्रिक्स कंपनीला चालवायला देण्यात आला होता.
त्यात पारदर्शक पध्दतीने व्यवहार झाला नसल्याचे आरोप किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर केले होते.
तसेच संबंधित ब्रिक्स कंपनीला कारखाना चालविण्याचा कुठलाही अनुभव नसताना देखील हे कंत्राट त्या
कंपनीला देण्यात आले. त्यावर किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर त्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोप केले होते.

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya on hasan mushrif home ed raid

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | फक्त विरोधकांवरच कारवाई का? मुश्रीफांच्या घरी ईडीच्या कारवाईवरून संजय राऊतांचा सवाल

Hasan Mushrif | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागलमधील घरावर ईडीची छापेमारी

Maharashtra Politics | विधानपरिषद उमेदवारी अन् देवेन भारतींच्या नियुक्तीवरून शिंदे गटात नाराजीचा सूर