Kirit Somaiya | ‘दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाविकास आघाडीला (MVA) इशारा दिलाय. दिवाळीनंतर (Diwali) फटाके फोडणार असं ट्विट करत किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिलाय. दिवाळीनंतर तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयाचे तीन अशा एकूण सहा घोटळ्यांचा पर्दाफाश (expose) करणार, असा इशारा सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिलाय.

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी म्हटले, भ्रष्टाचाराबाबत दिवाळीनंतर 6 जणांचे फटाके फोडणार आहे. यात 3 मंत्री आणि 3 जावई असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही दावा त्यांनी केला. ठाकरे (Thackeray) आणि पवारांनी (Pawar) महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. ते मलाड पूर्वमध्ये भाजप दिंडोशी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना बोलत होते.

दिवाळीनंतर 3 मंत्री आणि 3 जावयांचे फटाके फोडणार

सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. परंतु किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन तीन चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. घोटाळेबाज ठाकरे पवारांनी 12 दिवस नाटकं केली. यात 3 मंत्र्यांच्या 3 घोटाळ्यांचा आणि त्यांच्या 3 जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी (Hassan Mushrif) त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे. त्यांनी केवळ लवंगी फटाके फोडले, असे सोमय्या यांनी सांगितले.

 

हिंदू धर्म संस्कृतीचा विश्वासघात केला
ठाकरे सरकारला (Thackeray government) लाज वाटत नाही का? हिंदूहृदयसम्राटांचं नाव घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी आमचा विश्वासघात केला. नरेंद्र मोदींशी, भाजपशी विश्वासघात करा, पण हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राशी विश्वासघात आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP Leader kirit somaiya say will expose 6 corruption of thackeray government after diwali 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘समीर तेरा बाप ज्ञानदेव नही, दाऊद है म्हणतात, मग शरद पवारांना विचारा…’

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 79 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

SBI Quick | एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे सुद्धा चेक करू शकता SBI अकाऊंट बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया