Kirit Somaiya | खा. भावना गवळींना केला 100 कोटींचा घोटाळा, मुख्यमंत्री आणि पोलीस ‘प्रोटेक्ट’ करतात; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

वाशिम न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Kirit Somaiya| विरोधी पक्षाच्या नेत्यांवर घोटाळ्याचे मोठे आरोप करून खळबळ उडवून देणार भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी यावेळी यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी (MP Bhavna Gavli) यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. भावना गवळी यांनी खासदारकीच्या 22 वर्षांच्या काळात तब्बल 100 कोटींचा घोटाळा केला असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पोलीस त्यांना प्रोटेक्ट करत असल्यानेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, असा थेट आरोपही सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला आहे.

ईडी, सीबीआयकडे केली तक्रार

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप केले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, तेजराव पाटील थोरात उपस्थित होते.
यावेळी सोमय्या यांनी घोटाळ्याचे आपल्याकडे सबळ पुरावे असून ईडी, सीबीआय, सहकार मंत्री, आयकर विभाग, यासह अन्य ठिकाणी तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे आणि पोलीस गवळींना करतात ‘प्रोटेक्ट’

खासदार भावना गवळी आणि समुहाने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला.
त्याचे सबळ पुरावे आहेत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस प्रशासन गवळींना ‘प्रोटेक्ट’ करत आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

 

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप आणि प्रश्न…

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या कार्यालयातून पहाटे 5 वाजता 7 कोटींची रक्कम चोरीला गेल्याची तक्रार (एएफआयआर क्रमांक 389/2020) तब्बल दहा महिन्यानंतर रिसोड पोलिसांत दाखल केली. इतकी मोठी रक्कम कार्यालयात का ठेवण्यात आली होती?

चोरीला गेलेली 7 कोटीची रक्कम गवळी यांच्याकडे नेमकी कोठून आली? महामार्गाचे काम करणार्‍या कंत्राटदारांकडून केल्या जाणार्‍या वसूलीतून हा पैसा जमला का? असा सवाल सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.

55 कोर्टीचा बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाना खासदार भावना गवळी यांनी अवघ्या 25 लाखात खरेदी केला. या व्यवहारातही मोठा घोटाळा झाला आहे.

–  भावना गवळी यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर काही बँकांचे 11 कोटींचे कर्ज आहे.
मग गवळी यांची मालमत्ता बँकेने जप्त केली का? डिफॉल्टर झाल्याचे बँकांनी घोषित केले का?

 

Web Title : Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya says bhavana gawli committed scam rs 100 crore 22 years we have strong

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या स्वारगेट परिसरातील उच्चभ्रू कुटुंबातील सुनेवर कौटुंबिक अत्याचार; प्रीतम हसमुख जैन यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा

Phone Tapping Report | रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग अहवालाचे मुख्य पत्र तपास यंत्रणेला देण्याबाबत विचार करू – राज्य सरकार

Ahmednagar News | महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; ऑडिओ क्लिपमध्ये आमदारावर आरोप