Kirit Somaiya | ‘नवाब मलिकानंतर आता ‘या’ नेत्याचा नंबर’; मलिकांच्या अटकेनंतर सोमय्या पुन्हा गरजले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | राज्याच्या मंंत्रिमंडळातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे (ED Arrest Minister Nawab Malik). मलिकांच्या अटकेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार (Kirit Somaiya) किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया देताना राज्य सरकारमधील शिवसेना (Shiv Sena) पक्षावर निशाणा साधला आहे.

 

ठाकरे सरकारने (Thackeray Government) कितीही दादागिरी केली तरी त्यांच्या घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार आहोत. अनिल देशमुखांनंतर नवाब मलिक आणि आता तिसरा नंबर हा शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचा असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

 

नवाब मलिक यांना आता कोर्टात नेलं असून युक्तीवादाला सुरूवात झाली आहे.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते भाजपवर (BJP) निशाणा साधताना दिसत आहेत.
अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली.

 

दरम्यान, हा आणखी एका सत्तेच्या दुरुपयोगाचा प्रकार आहे. कोणतीही नोटीस (Notice) न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे ही सर्वच गोष्टींची पायमल्ली आहे.
हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील असल्याचं जंयत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | BJP Leader On Thackeray Government Minister Nawab Malik Arrest ED

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा