Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची मागणी, म्हणाले – ‘अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची CBI चौकशी करा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – 100 कोटींच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपुरातील घरावर शुक्रवारी (दि. 25) सकाळी ईडीने (ED) छापे टाकले आहेत. यावरून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. येत्या दिवसांत अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) अटक होईलच. एवढच नाही तर अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, अनिल परब, मिलिंद नार्वेकरांची (Anil Parab, Milind Narvekar) सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. दरम्यान अनिल देशमुख छगन भुजबळांच्या मार्गावर जात आहेत. भुजबळांना सर्वोच्च न्यायालयानेही 3 वर्षे तुरूंगात ठेवलं होते. त्यामुळे देशमुख आता केंव्हा जेलमध्ये जाणार याची उत्कंठता व प्रतीक्षा राज्यातील जनतेला असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर टीकास्त्रं सोडलं आहे. सोमय्या म्हणाले की, अनिल परबनंतर मिलिंद नार्वेकरांना परब यांच्याच वाटेने जावे लागणार आहे. नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर परबांच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधायला सुरुवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडे तोडली आहेत. आज त्या जागेची किंमत 10 कोटी आहे. दोन मजली बंगल्याच बांधकाम सुरू आहे. परब यांच्या बंगल्यावर नार्वेकर जातात अन् नार्वेकरांच्या बंगल्यावर परब जातात आणि दोघांच्या बंगल्याची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे घेतात, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे. एका बाजुला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कागदावर 19 बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर 25 कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजुला अनिल परब यांनी रिसॉर्ट तर बांधला पण रिसॉर्टच्या बाजुला परबांचा बंगला देखील आहे आणि म्हणून आमची मागणी आहे. उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांसाठी सीबीआय चौकशी व्हायला हवी, असी मागणी सोमय्यांनी केली आहे.

हे देखील वाचा

Delta Plus Variant | डेल्टा प्लसचे पेशंट वाढल्याने राज्यात लॉकडाऊन? आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Kirit Somaiya | cbi probe into anil parab milind narvekar kirit somaiyas demand

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update