Kirit Somaiya | CM उद्धव ठाकरेंसह तेजस ठाकरेंवरही किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | मागील काही महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघत आहे. त्यातच आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांचा सपाटा लावणारे भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले की, ”आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), तेजस ठाकरे (Tejas Thackeray), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (Como Stocks And Properties Pvt) कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) आणि ल्यूक बेनेडिक्ट (Luke Benedict) यांना 2019 मध्ये विकली आणि यामध्ये सात कोटींचा मनी लाँड्ररिंगचा (Money Laundering) व्यवहार झाला, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.

पुढे सोमय्या म्हणाले, ”कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी नंदकिशोर चतुर्वेदी
यांच्या या कंपनीमध्ये 56 टक्के, लुक बॅनटिक ऑस्ट्रेलियाचा 34 टक्के आणि इतरांचा 10 टक्के हिस्सा आहे.
या कंपनीच्या व्यवहारासाठी 7 कोटींचा मनी लाँडरिंग व्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.’
तसेच ”मी लवकरच दिल्लीला जाणार आहे, या सर्व घोटाळ्यांची माहिती ईडी (ED), इन्कम टॅक्स (Income Tax)
आणि संबंधीत विभागांना देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | cm uddhav thackery and tejas thackeray money laundering serious allegations by kirit somaiya

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वार्षिक 36 % परतावा देण्याच्या अमिषाने अनेकांची 11 कोटीची फसवणूक, पुण्यातील झेन मनी प्लॅन्टच्या संचालकांसह 6 जणांवर FIR

 

Petrol Diesel Prices Increased In Pune | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा दरवाढ; मागील वेळेपेक्षा तिप्पट वेगाने वाढताहेत किंमती

 

Deepika Padukone Hot Look | डेनिम टॉपमध्ये दीपिका पादुकोननं दिल्या हॉट पोज, फोटो पाहून सोशल मीडियावर लागली आग