Kirit Somaiya | ‘किरीट सोमय्यांची न्यायालयीन चौकशी करा’, हायकोर्टाचे निर्देश; पण कोणत्या प्रकरणात?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ईडीच्या (ED) कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्यात विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात असून भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ही मोहीम हाती घेतली आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला होता. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिले आहेत.

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या मालमत्तांवर ईडीने नुकतीच छापेमारी केली होती. तसेच गुन्हा (FIR) दाखल केला होता. यानंतर ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यासाठी माझ्याविरोधात हेतुपुरस्सर गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना दिलासा देत किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) झटका दिला आहे.

हसन मुश्रीफ यांना दिलासा देताना 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना
मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मुश्रीफांवर याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते
किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले.
या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या (Pune Sessions Court) प्रधान न्यायाधीशांना (Chief Justice)
चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title : Kirit Somaiya | hasan mushrif ed case bombay high court directs judicial enquiry on bjp leader kirit somaiya

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sada Sarvankar | शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांना ‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून ‘क्लिन चीट’

Urfi Javed | उर्फी जावेदने ‘या’ कारणामुळे खतरो के खिलाडी कार्यक्रमास दिला नकार