Kirit Somaiya Injury Medical Report | भाजप नेते किरीट सोमय्यांच्या जखमेबाबत वैद्यकीय अहवालातून समोर आली महत्वाची माहिती, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya Injury Medical Report | भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर खार पोलीस स्टेशनमध्ये (Khar Police Station) हल्ला झाला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. किरीट सोमय्यांनी थेट केंद्रीय गृह सचिवांकडे याबाबत तक्रार दिली होती. सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी, सोमय्यांनी टोमॅटो सॉस लावला असल्याचं म्हटलं होतं. मात्र अशातच आता सोमय्यांच्या जखमेबाबत भाभा रूग्णालयाने (Bhabha Hospital) याबाबत माहिती दिली आहे. (Kirit Somaiya Injury Medical Report)

 

किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक झाली, गाडीच्या काचा फुटल्यानंतर त्यांच्या हनवटीला जखम झाली होती. ही जखम 0.1 सेमी इतकी झाली होती आणि रक्तस्त्रावही झाला नसल्याचं वैद्यकीय तपासणीच्या अहवालातून नमूद करण्यात आलं असून हा अहवाल मुंबई पोलिसांनाही देण्यात आल्याची माहिती समजत आहे.

किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सरकारवर निशाणा साधला होता.
या हल्ल्यावरून आता सोमय्यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey)
यांच्यावर निशाणा साधला असून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माझ्यावर जो हल्ला झाला त्यात संजय पांडे (Kirit Somaiya on Sanjay Pandey) यांच्या सांगण्यावरून
खार पोलीस स्टेशनचे अधिकारी सहभागी झाले असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, किरीट सोमय्या आज भाजप नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत.
या भेटीनंतर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya Injury Medical Report | bhabha hospital mumbai medical report reveals important information kirit somaiya attack case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा