Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित ?; किरीट सोमय्या म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Kirit Somaiya | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन (Ayodhya Tour) राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह (BJP MP Brijbhushan Singh) यांच्याकडून जोरदार विरोध दर्शविला जात आहे. तसेच तेथील साधू, संत देखील वि्रोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर अखेर राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती आज दिली. यावरुन भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा स्थगित केला आहे. याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना विचारलं असता त्यावर ते म्हणाले, ”राम हा हिंदुस्थानातील देव आहे. रामाच्या चरणी कोणालाही जायला सूट असते. रामजन्मभूमी मंदिरात दर्शनासाठी कोणीही जाऊ शकते. सगळ्यांना त्याचा अधिकार आणि सूट आहे. हे दोन विषय वेगळे आहेत.” असं किरीट सोमय्या म्हणाले.

पुढे किरीट सोमय्या म्हणाले, “एका बाजुला मनसे आणि दुसऱ्या बाजुला माफिया सेना यांचं भांडण सुरू आहे. माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतला आहे. आता रोज उठून माफिया सेनेचे लोक एकमेकांना जय रामजी की, नमस्कार, जय महाराष्ट्र म्हणत नाही, तर आदाब म्हणतात,” असं म्हणत त्यांनी शिवसेनेला (Shivsena) टोला लगावला आहे.

 

उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला..
“माझ्यावर जितेंद्र नवलानी यांनी नाही तर उद्धव ठाकरे यांनी आरोप केले होते.
त्यांनी पंतप्रधानांवर, केंद्र सरकारवर, ईडीवर, ईडीच्या चार अधिकाऱ्यांवर आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले होते.
हे सगळे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे जमवतात असे आरोप करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी खूप मोठा तमाशा केला,” असा आरोप देखील त्यावेळी किरीट सोमय्या यांनी केला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | kirit somaiya comment on decision of raj thackeray to postpone ayodhya visit

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा